Kalyan Bangladeshi Women Arrested : कल्याण येथून २ बांगलादेशी घुसखोर महिला अटकेत !

कल्याण : येथील मलंग रस्ता भागातील आडिवली ढोकळी भागात काका ढाब्याजवळील दोन गृहसंकुलातून अवैधरित्या वास्तव्य करणार्‍या २ बांगलादेशी महिला आणि त्यांना आश्रय देणार्‍या दोघांना उल्हासनगर पोलिसांनी अटक केली. त्यांच्याजवळ पारपत्र नव्हते. फरजाना शिरागुल शेख (वय ३६ वर्षे) आणि बिथी उपाख्य प्रिया नूरइस्लाम अख्तर (वय २४ वर्षे) अशी महिलांची नावे आहेत. त्या दोघींना ताहीर मुनीर अहमद खान (वय ३५ वर्षे) आणि गणेश चंद्रा दास (वय ३७ वर्षे) यांनी आश्रय दिला होता.

संपादकीय भूमिका

भारतात अवैधरित्या रहाणार्‍यांना बांगलादेशात हाकलून द्यायला हवे !