शाहूनगरमध्ये बुरखाधारी महिलेने २.५ तोळे सोन्याचे गंठण पळवले !

प्रतिकात्मक छायाचित्र

सातारा, ११ मार्च (वार्ता.) – शहरातील शाहूनगरमध्ये दुकानात किराणा घेण्यासाठी आलेल्या बुरखाधारी महिलेने दुकानदार महिलेच्या गळ्यातील २.५ तोळे वजनाचे दुपदरी गंठण हाताने ओढून पळवून नेले.  माया माने यांचे किराणामालाचे दुकान आहे. १० मार्च या दिवशी दुपारी २ वाजता ही घटना घडली. या वेळी दुकानाबाहेर हेल्मेट घालून एक दुचाकी चालक उभा होता. गंठण चोरल्यावर गाडीवर बसून दोघेही पळून गेले. माया माने यांनी आरडाओरड केली; मात्र दुपारची वेळ असल्याने त्यांना साहाय्य मिळू शकले नाही.

संपादकीय भूमिका

  • धर्मांधांच्या जोडीला आता बुरखाधारी महिलाही गुन्हेगारी जगतात पुढाकार घेत असणे राष्ट्रासाठी धोकादायक !
  • अशा महिलांना कठोर शिक्षा देणे आवश्यक !