भोर (पुणे) येथे पारंपरिक पद्धतीने श्री गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन !

भोर शहरातील शनिघाट (राजवाडा), निरामाई घाट, रामबाग येथील ओढा, भाटघर धरण येथे घरगुती आणि सार्वजनिक गणेशमूर्तींचे वहात्या पाण्यात विसर्जन होत आहे.

‘गेट वे ऑफ इंडिया’ जवळील समुद्रात विसर्जनाला ‘मुंबई पोर्ट ट्रस्ट’ची अनुमती !

गिरगाव चौपाटी, दादर चौपाटी, माहीम, जुहू समुद्रकिनार्‍यांसह आरे कॉलनी आणि इतर ठिकाणच्या तलावांवर विसर्जनाची सिद्धता केली आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मुंबई पोलिसांकडून विशेष बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.

वाकड (पुणे) येथे पर्यावरण रक्षणाच्या नावाखाली नागरिकांना कृत्रिम विसर्जन हौदात मूर्ती विसर्जन करण्याचे आवाहन

हिंदूंना धर्माचरणापासून परावृत्त करणार्‍यांपासून सावध राहून हिंदूंनी धर्मशास्त्रानुसारच मूर्तीविसर्जन करावे !

हडपसर (पुणे) क्षेत्रीय कार्यालयांतर्गत ३६ ठिकाणी मूर्ती संकलनाची व्यवस्था, तसेच १५ फिरते विसर्जन हौद !

मूर्तीविसर्जनाचे धर्मशास्त्र पाळण्यास प्रशासनाकडून होणारा प्रतिबंध, हा हिंदूंवरील अन्यायच आहे ! अन्य धर्मियांच्या बाबतीत अशी शास्त्रविरोधी भूमिका घेण्याचे धाडस प्रशासन दाखवेल का ?

सांगली महापालिका प्रशासनाच्या मूर्तीदान मोहिमेस नगण्य प्रतिसाद !

सहस्रो भाविकांचे कृष्णा नदीत शास्त्रानुसार श्री गणेशमूर्ती विसर्जन !

इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर) येथे हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे यांच्या यशस्वी लढ्यामुळे भाविकांना पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती !

भाविकांच्या धर्मभावना जपण्यासाठी यशस्वी लढा देणार्‍या हिंदुत्वनिष्ठ, लोकप्रतिनिधी, गणेशोत्सव मंडळे आणि श्री. कौशिक मराठे यांचे अभिनंदन !

पिंपरीत (पुणे) ‘आसवानी असोसिएट्स’ आणि ‘ॲस्पीफ्लाय इनव्हायरमेंट’ या संस्थांच्या वतीने श्रींच्या मूर्ती विसर्जनासाठी कृत्रिम हौदांची निर्मिती !

हौदांत मूर्तीविसर्जन करणे, हे तर अशास्त्रीय आहेच, त्याहीपुढेही हे पापच आहे. याचे पातक केवळ मूर्तीदान करवून घेणार्‍यांनाच नव्हे, तर मूर्तीदान देणार्‍यांनाही लागेल !

पिंपरी (पुणे) शहरातील विसर्जन घाटांवर वैद्यकीय सेवा पथक सज्ज !

शहरातील प्रमुख १० श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर वैद्यकीय पथकांसह रुग्णवाहिका तैनात ठेवली आहे, तसेच या घाटांसह इतर घाटांवरही जीवरक्षक, अग्नीशमनदल, आपत्ती व्यवस्थापन आणि सुरक्षा पथक नेमण्यात आले आहेत.

प्रशासनाने श्री गणेशमूर्ती विसर्जनाविषयी कायदाबाह्य भूमिका न घेता सकारात्मक भूमिका घ्यावी ! – कौशिक मराठे, इचलकरंजी

ज्या श्री गणेशाची आपण मनोभावे पूजा करतो, त्या श्री गणेशमूर्तीचे विसर्जन हे योग्य प्रकारे भाविकांची भावना जपून करणे आवश्यक आहे.

श्री गणेशमूर्तीचे विसर्जन नैसर्गिक जलस्रोतांमध्ये न करता मूर्तीचे दान करावे ! – तळेगाव दाभाडे नगर परिषदेचे धर्मद्रोही आवाहन

घरी मूर्तीच्या विसर्जनासाठी नगर परिषदेकडून अमोनियम बाय कार्बोनेटचे विनामूल्य वाटप