पुण्यातील निर्बंधमुक्त मिरवणूक, पोलिसांचे ढिसाळ नियोजन, मंडळांवर कारवाई यांविषयी हलगर्जीपणा याविषयी पोलिसांना पुणेकरांकडून नोटीस !

श्री गणेशमूर्ती विसर्जन मिरवणुकीमध्ये सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशांचे उल्लंघन करण्यात आले. मानाच्या गणेशोत्सव मंडळांनी विसर्जन मिरवणुकीसाठी घेतलेला अधिक वेळ, ढोल-ताशा पथकांतील वादकांची संख्या मर्यादित ठेवण्याकडे..

पुणेकरांच्या कराचा वाया गेलेला पैसा आयुक्तांच्या आणि अन्य अधिकार्‍यांच्या खिशातून वसूल करावा ! – विवेक वेलणकर, ‘सजग नागरिक मंचा’चे अध्यक्ष

गणेशोत्सवासाठी लोखंडी टाक्यांपासून मूर्ती संकलनापर्यंत सर्व नियमित गणेशमूर्तीच्या विसर्जनाचे पर्याय उपलब्ध होते; मात्र त्यानंतरही आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांनी गणेशोत्सवाच्या कालावधीत १५० फिरते हौद भाडेकराराने घेण्याचा निर्णय घेतला होता…

धर्माभिमान जागृत करूया !

हिंदूंनी साधना आणि धर्माचरण केल्यासच त्यांना सण-उत्सव कसे साजरे करावेत ? हे लक्षात येईल आणि त्यांच्यातील धर्माभिमान जागृत झाल्यास अशा प्रकारे चुकीच्या कृती त्यांच्याकडून होणार नाहीत.

श्री गणेशमूर्ती विसर्जनानंतर क्रीडामंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत गिरगाव चौपाटीची स्वच्छता !

या वेळी राज्य कार्यालयातील कर्मचारी, अधिकारी आणि इतर असे ४०० सभासद, एन्.सी.सी. मधील १ सहस्र ५०० मुले-मुली अन् अधिकारी, असे एकूण अनुमाने २ सहस्र सभासद सहभागी झाले होते.

पुणे येथे वर्ष २०१९ च्या तुलनेत श्री गणेशमूर्ती लाखाने घटल्या !

यंदाच्या वर्षी उत्सवावरील कोरोनाचे निर्बंध हटवल्याने, तसेच महापालिकेत समाविष्ट २३ गावांमधील गणेशोत्सव मंडळे आणि घरगुती गणपती यांमुळे मूर्तींची संख्या वाढेल अशी अपेक्षा होती

नवी मुंबईत कृत्रिम तलावांपेक्षा नैसर्गिक जलस्रोतांत श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनास प्राधान्य !

अनंतचतुर्दशीच्या दिवशी शहरातील विविध नैसर्गिक आणि कृत्रिम तलावांमध्ये ९ सहस्र ९६ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यांपैकी ५ सहस्र २७९ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन नैसर्गिक तलावांमध्ये करण्यात आले. कृत्रिम तलावांपेक्षा पारंपरिक पद्धतीने नैसर्गिक जलस्रोतांमध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनाला भाविकांनी प्राधान्य दिले.

पुणे येथे ३ लाखांहून अधिक गणेशमूर्तींचे धर्मशास्त्रविसंगत विसर्जन !

अनंत चतुर्दशीच्या दिवशी म्हणजे ९ सप्टेंबर या दिवशी ३ लाख १० सहस्र १५८ गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. यामध्ये ६८ सहस्र ५४७ मूर्तींचे बांधलेल्या हौदात, १ लाख ३२ सहस्र ९९९ मूर्तींचे लोखंडी टाक्यांमध्ये, ४० सहस्र ५२२ मूर्तींचे फिरत्या हौदात विसर्जन करण्यात आले.

धर्मवीर संभाजी महाराज तलावामध्ये श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनास सोलापूर महापालिकेकडून निर्बंध !

पाण्यामध्ये ‘केवळ श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्याने प्रदूषण होते’, असा कुठलाही अहवाल नसतांना कशाच्या आधारावर श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांना बंदी केली जात आहे ?

पनवेल येथे ११ भाविक विजेच्या धक्क्याने घायाळ !

वडघर खाडी परिसरात विसर्जन घाटावर रात्री ८.३० वाजता हा प्रकार घडला. गर्दीच्या वेळी विजेची तार तुटली आणि ती थेट गणेशभक्तांवरच पडली. त्यामुळे विजेचा तीव्र धक्का बसला.

मुंबई, रायगड आणि रत्नागिरी येथील समुद्रकिनार्‍यांवर आलेले श्री गणेशमूर्तींचे अवशेष उचलले !

मनसेच्या वतीने ‘आपला समुद्रकिनारा, आपले दायित्व’ मोहीम !