सोलापूर शहरात १२ ठिकाणी कृत्रिम कुंडांत श्री गणेशमूर्ती विसर्जन करण्याचे महापालिकेचे अशास्त्रीय आवाहन !

वर्ष २०२१ मध्ये उजनी धरणाच्या ‘बॅक वॉटर’मध्ये ‘फेकल केिलफॉर्म’ हा जिवाणू आढळून आला होता. धरणात सोडण्यात येणार्‍या सांडपाण्यामुळे होणारे हे प्रदूषण प्रशासनाला दिसत नाही का ? कि केवळ हिंदु धर्मशास्त्राला विरोध करण्यासाठी ‘मूर्तीमुळे प्रदूषण होते’ असा कांगावा करायचा आहे ?

मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघणार ! – न्यायालयाचा निकाल

मानाच्या गणपति विसर्जन मिरवणुकीपूर्वी अन्य मंडळांना लक्ष्मी रस्त्यावरून मिरवणूक काढण्यास अनुमती द्यावी, या मागणीसाठी दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली. त्यामुळे लक्ष्मी रस्ता येथून मानाच्या ५ गणपतींची मिरवणूक आधी निघेल, असा निकाल न्यायालयाने दिला आहे.

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी स्वयंचलित यंत्र वापरून हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍या संबंधितांवर कायदेशीर कारवाई करा !

हिंदूंना अशी मागणी का करावी लागते ? हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणार्‍यांवर सरकारी यंत्रणांनी स्वतः कारवाई करणे आवश्यक !

कोल्हापूर महापालिकेच्या कृतीमुळे हिंदूंच्या देवतेचा अवमान ! – नितेश राणे, आमदार, भाजप

कोल्हापूर महापालिकेने भाविकांकडून विविध कुंडांमध्ये गोळा केलेल्या श्री गणेशमूर्ती इराणी खणीत विसर्जित करतांना त्या फेकल्याचा ‘व्हिडिओ’ समोर आला आहे. या संदर्भात अनेकांनी त्यावर संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

आळंदी नगर परिषदेने इंद्रायणी नदीत मूर्तीविसर्जनास बंदी घातल्याचे प्रकरण !

हिंदूंच्या धार्मिक स्वातंत्र्याची गळचेपी करून हिेंदूंना श्री गणेशमूर्तीचे वहात्या पाण्यात विसर्जन करू देण्यास रोखणारे धर्मद्रोही प्रशासन ! गणेशभक्तांकडून विश्वासाने घेतलेल्या श्री गणेशमूर्तींचे धार्मिक पावित्र्य जपून विसर्जन होणे अपेक्षित असतांना तसे केले जात नसल्याचे निदर्शनास आले आहे.

वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्ती विसर्जनास मज्जाव केल्याने पुण्यात अनेक ठिकाणी भाविकांची गैरसोय !

श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी नागरिकांची गैरसोय करणारे महापालिका प्रशासन हिंदुद्वेषीच म्हणावे लागेल. धर्मशास्त्रविरोधी हौदात मूर्तीविसर्जन, रासायनिक प्रक्रियेने मूर्तीविसर्जन, मूर्तीदान हे उपक्रम न राबवता वहात्या पाण्यात भाविकांना मूर्तीविसर्जन करू दिले असते, तर त्यांची गैरसोय झाली नसती !

पिंपरी-चिंचवड शहरातील सर्व क्षेत्रीय अधिकार्‍यांनी श्री गणेशमूर्ती विसर्जनस्थळी वैयक्तिक लक्ष द्यावे ! – उल्हास जगताप, अतिरिक्त आयुक्त

‘जनसंवाद सभे’ मध्ये श्री गणेशमूर्ती विसर्जन घाटांवर महापालिकेने विसर्जनाच्या पुढील दिवसांसाठी अधिक मनुष्यबळासह सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली.

इचलकरंजी येथे विसर्जनासाठी गेलेला युवक पंचगंगेत बुडाला !

आपत्ती व्यवस्थापनाकडून या युवकाचा शोध चालू आहे.

नागपूर शहर तलावात श्री गणेशमूर्तींच्या विसर्जनावर निर्बंध घातल्याने मूर्ती विसर्जनाविषयी गणेशोत्सव मंडळांसमोर पेच !

अनंतचतुर्दशीच्या दिवशी श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केले जाईल. तथापि येथील महानगरपालिकेने शहरातील सर्वच तलावांमध्ये श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनावर पूर्णपणे बंदी घातली आहे. त्यामुळे या वर्षी मूर्तींचे विसर्जन करायचे कुठे ? असा मोठा प्रश्न गणेशोत्सव मंडळांसमोर निर्माण झाला आहे.

उत्तरप्रदेशातील चंदौली येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या वेळी मुसलमानांकडून दगडफेक

हिंदूंच्या मिवणुकांवर आक्रमण करून त्यांना त्रास देण्याचा विचारही अल्पसंख्यांकांच्या मनात येऊ नये, एवढी वचक पोलीस निर्माण करतील का ?