ठाणे येथे विसर्जन मिरवणुकीत ‘जय श्रीराम’च्या घोषणेवर मुसलमानांचा आक्षेप !

हिंदुबहूल देशात हिंदूंना घोषणा देण्यासाठी आक्षेप घेण्यास हे पाकिस्तान आहे का ?

‘शाडू मातीची श्री गणेशमूर्ती आणूया’, असे आवाहन करणार्‍या कोल्हापूर महापालिकेची श्री गणेशमूर्ती ‘प्लास्टर ऑफ पॅरिस’ची !

कोल्हापूर महापालिकेच्या ‘लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण कोरडे पाषाण’ अशा वृत्तीमुळे जनता महापालिकेवर विश्‍वास ठेवणार का ?

पुणे येथे गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवशी ९५ सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवशी शहरामध्ये ९५ सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये बांधलेल्या हौदांमध्ये १७ सहस्र ६६२, लोखंडी हौदांमध्ये ५९ सहस्र ३००, तर फिरत्या हौदांमध्ये ४ सहस्र ४१, तर १३ सहस्र ७९२ श्री गणेशमूर्तींचे दान करण्यात आले. विर्सजनाच्या वेळी अनुमाने १ लाख २५ सहस्र किलो निर्माल्य गोळा करण्यात आले.

पंचगंगेवर होणार्‍या आरतीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठांची उपस्‍थिती !

२३ सप्‍टेंबरला भाविकांनी प्रशासनाचे बंधन झुगारून देऊन उत्‍स्‍फूर्तपणे श्री गणेशमूर्तींचे पंचगंगेत विसर्जन केले. यानंतर पंचगंगा नदीवर प्रतिदिन सायंकाळी ६ वाजता होणार्‍या पंचगंगेच्‍या आरतीसाठी तेथील भाविक श्री. स्‍वप्‍नील मुळे यांनी सर्व हिंदुत्‍वनिष्‍ठांना आरतीसाठी उपस्‍थित राहून सहभागी होण्‍याविषयी विनंती केली.

पुणे येथील नाना-नानी उद्यानसमोरील कृत्रिम हौदाची विदारक स्‍थिती !

अत्‍यंत गढूळ पाणी आणि प्रचंड कचरा असलेला श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ठेवलेला कृत्रिम हौद !

पुणे येथे विसर्जन हौदांवरील कर्मचार्‍यांकडून पैशांची मागणी

हिंदूंनो अशा कर्मचार्‍यांना पैसे न देता त्‍यांची वरिष्‍ठांकडे तक्रार करा !

पुणे येथे विसर्जन घाट बंद केल्‍याने नाईलाजाने भाविकांना श्री गणेशमूर्ती कृत्रिम हौदात विसर्जित कराव्‍या लागल्‍या !

कृत्रिम हौदात विसर्जन केलेल्‍या श्री गणेशमूर्तींचे रात्रीच्‍या वेळी समुद्र, नदी अथवा नैसर्गिक जलस्रोतातच गुपचूप विसर्जन केले जाते, असे अनेकदा उघड झाले आहे. यात कुठल्‍याही प्रकारे श्री गणेशमूर्तींचे पावित्र्य राखले जात नाही.

सातारा येथे घरगुती श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन करण्‍याकडे भाविकांचा कल !

हिंदु जनजागृती समितीच्‍या वतीने संगम माहुली येथील नदीकाठी भाविकांचे प्रबोधन करण्‍यात येत होते. या प्रबोधनामुळे अनेक भाविकांनी श्री गणेशमूर्तींचे वहात्‍या पाण्‍यात विसर्जन केले.

शास्‍त्रसंमत विसर्जनाचा आग्रह ! Ganesh Visarjan

पर्यावरणाच्‍या नावाखाली शास्‍त्र पालन करण्‍यास सहस्रो हिंदूंना विरोध करण्‍याचे, त्‍यातून धर्महानी करण्‍याचे मोठे पाप प्रशासनाला लागत आहे, हे त्‍यांनी लक्षात घ्‍यावे. हिंदूंना प्रशासनाने केलेली त्‍यांची दिशाभूल आता कळून चुकत असल्‍याने ते स्‍वयंस्‍फूर्तीने शास्‍त्रानुसार विसर्जनाचाच आग्रह धरत आहेत, हे चांगले लक्षण आहे !

परराज्यातून आणलेल्या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्ती पुजून शासनाच्या एका चांगल्या योजनेची थट्टा उडवली जात आहे ! – प्रा. राजेंद्र केरकर Ganesh Visarjan

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या श्री गणेशमूर्तींवर कित्येक वर्षे बंदी असूनही त्या वापरल्या जाणे प्रशासनासाठी लज्जास्पद !