सिंहगड रस्ता क्षेत्रीय विभागातील प्रकार
पुणे – महापालिका प्रशासनाकडून शहरातील विविध भागांमध्ये ४५० विसर्जन हौदांची व्यवस्था करण्यात आली आहे. या विसर्जन हौदांवर काम करण्यासाठी कर्मचार्यांची नियुक्ती केली आहे; मात्र श्री गणेशभक्त मूर्ती विसर्जनासाठी या हौदांवर आल्यानंतर मूर्ती विसर्जनानंतर ते कर्मचारी पैशांची मागणी करतांना लक्षात आले आहे. काही ठिकाणी पैसे नसल्यास, ‘ऑनलाईन’ पैसे देण्यासाठी सांगण्यात येत आहे. हा सर्व प्रकार विशेषत: सिंहगड रस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये दिसून आला आहे.
संपादकीय भूमिका :हिंदूंनो अशा कर्मचार्यांना पैसे न देता त्यांची वरिष्ठांकडे तक्रार करा ! |