श्री गणेमूर्तीदान मोहिमेस तीव्र विरोध केल्याने भोर (पुणे) मध्ये प्रतिवर्षीप्रमाणे मूर्तींचे वहात्या पाण्यात १०० टक्के विसर्जन !

भोरचा आदर्श इतरही गावांनी घेऊन मूर्तीदान न करता श्री गणेशमूर्तीचे विसर्जन वहात्या पाण्यातच करून श्री गणेशाची कृपा संपादन करून घ्यावी !

सांगलीत श्री गणेशमूर्ती विसर्जनाच्या दिवशीच महापालिकेकडून शेरीनाल्याचे सांडपाणी कृष्णा नदीत !

संस्थांच्या मूर्तींसह घरगुती श्री गणेशमूर्तींचे पाचव्या दिवशी कृष्णा नदीत विसर्जन होते, हे ठाऊक असतांना महापालिकेच्या सांडपाणी विभागाने शेरीनाल्यातील सांडपाणी आणि ड्रेनेजचे पाणी कोरड्या पडलेल्या कृष्णा नदीत सोडून दिल्याने सांगलीकरांकडून संताप व्यक्त होत आहे.

हिंदु जनजागृती समितीच्या प्रबोधनानंतर श्री गणेशमूर्तींचे दान न स्वीकारण्याचा देगाव ग्रामपंचायतीचा निर्णय !

समितीने प्रबोधन केल्यानंतर या फलकावरील मूर्तीदान घेण्याविषयीचा मजकुर दिसू नये, यासाठी ग्रामपंचायतीकडून त्यावर पट्टी लावण्यात आली.

कोल्हापुरात गणेशभक्तांकडून बॅरिकेट्स (तात्पुरते अडथळे) तोडून पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्तींचे विसर्जन !

‘हिंदूंचे सण आल्यावरच प्रशासनाला प्रदूषण कसे काय आठवते ? न्यायालयाचा मशिदीवरील भोंगे काढण्याचाही आदेश आहे, मग त्याचे पालन प्रशासन कधी करणार ? – श्री .उदय भोसले

गोव्यात आजपासून जोरदार पावसाचा वेधशाळेचा अंदाज

राज्यात चालू हंगामात आतापर्यंत एकूण ११८ इंच पाऊस पडला असून पावसाने सरासरी लक्ष्य पार केले आहे. आता पडणारा पाऊस अतिरिक्त असेल ! ऐन गणेशचतुर्थीच्या काळात अधिक प्रमाणात पाऊस पडल्याने लोकांना मूर्ती विसर्जनात अडथळा निर्माण होत आहे.

इराणी खण (कोल्‍हापूर) येथे श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी ‘कन्‍व्‍हेअर बेल्‍ट’ !

कोल्‍हापूर महापालिका प्रशासनाने इराणी खण येथे गतवर्षीप्रमाणे घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी हिंदु धर्मशास्‍त्राचा कोणताही आधार नसणार्‍या ‘यांत्रिक पद्धती’चा (कन्‍व्‍हेअर बेल्‍टचा) वापर करण्‍याचे ठरवले असून १५ सप्‍टेंबरला त्‍याची चाचणी घेण्‍यात आली.

पुणे महापालिकेकडून फिरत्‍या हौदांना अद्यापही मान्‍यता नाही !

यंदाच्‍या वर्षी फिरत्‍या हौदांची आवश्‍यकता नसतांनाही प्रशासनाने शहरामध्‍ये श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी फिरत्‍या हौदांची निविदा काढली. त्‍यासाठी १ कोटी ४२ लाख रुपयांच्‍या २ निविदा काढण्‍यात आल्‍या.

विसर्जनासाठी वरिष्‍ठ पातळीवरून येणार्‍या आदेशांचे पालन करावे लागते ! – पोलीस अधीक्षक

बळजोरी पुढील दिवसांमध्‍ये घरगुती श्री गणेशमूर्ती विसर्जनासाठी भाविकांवर करू नये, या मागणीसाठी हिंदुत्‍वनिष्‍ठ संघटनांच्‍या प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची भेट घेतली.

पालघर येथे श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना ३ जणांचा बुडून मृत्‍यू !

वाडा तालुक्‍यातील कोणसई गावात ओहळावर आस्‍थापनातील श्री गणेशमूर्तीचे विसर्जन करतांना जगन मौर्य (वय ३८ वर्षे) आणि सुरज प्रजापति (वय २५ वर्षे) या परप्रांतियांचा बुडून मृत्‍यू झाला.

श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्‍ती करू नका !

पन्‍हाळा तालुक्‍यातील कोडोली ग्रामपंचायत कार्यालयात श्री गणेशमूर्तीदान मोहिमेस सक्‍ती करू नये; म्‍हणून ग्रामसेवक श्री. जयवंत विष्‍णु चव्‍हाण आणि श्री. प्रकाश पाटील यांना निवेदन देण्‍यात आले.