पुणे – गणेशोत्सवाच्या ५ व्या दिवशी शहरामध्ये ९५ सहस्र श्री गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यात आले. त्यामध्ये बांधलेल्या हौदांमध्ये १७ सहस्र ६६२, लोखंडी हौदांमध्ये ५९ सहस्र ३००, तर फिरत्या हौदांमध्ये ४ सहस्र ४१, तर १३ सहस्र ७९२ श्री गणेशमूर्तींचे दान करण्यात आले. विर्सजनाच्या वेळी अनुमाने १ लाख २५ सहस्र किलो निर्माल्य गोळा करण्यात आले.
गणेशोत्सवाच्या प्रारंभापासून आतापर्यंत १ लाख ३५ सहस्र ११२ किलो निर्माल्य घनकचरा व्यवस्थापन विभागातील कर्मचार्यांनी गोळा केले आहे. या निर्माल्यावर प्रक्रिया करून महापालिका त्यापासून खत निर्मिती करते. (धर्मशिक्षणाच्या अभाव असल्यामुळे निर्माल्याचे खत बनवू नये, हे समजत नाही ! – संपादक) आतापर्यंत १५ सहस्र ५५७ श्री गणेशमूर्ती दान स्वरूपात संकलित करण्यात आल्या आहेत.