‘डीजे’च्‍या आवाजामुळे हृदयविकाराचा झटका येऊन तरुणाचा मृत्‍यू !

डीजे’सारखी मोठा आवाज करणारी ध्‍वनीयंत्रणा वापरून आपणच उत्‍सवांचे पावित्र्य नष्‍ट करत आहोत, हेही मंडळांनी लक्षात घेतले पाहिजे. त्‍याही पुढे जाऊन अशातून झालेल्‍या तरुणाच्‍या मृत्‍यूचे दायित्‍व आता कोण घेणार ?

‘गंगावेस ते पंचगंगा नदी’ हा मिरवणूक मार्ग चालू करावा ! – किशोर घाटगे, शिवसेना, उपजिल्‍हाप्रमुख

श्री. घाटगे यांनी पत्रकात म्‍हटले आहे की, २१ फुटी किंवा त्‍यापेक्षा अधिक मोठ्या मूर्तींचे इराणी खणीत विसर्जन करावे. प्रशासनाने जनभावनेचा आदर करावा आणि त्‍याचसमवेत पंचगंगा घाटावर युद्धपातळीवर सुविधा उपलब्‍ध करून द्याव्‍यात.

Ganesh Visarjan : श्री गणेशमूर्तीचे कृत्रिम हौदांऐवजी पारंपरिक पद्धतीने विसर्जन करा !

गणेशमूर्ती विसर्जनावरून आगपाखड करणारे पर्यावरणप्रेमी नदीत विनाप्रक्रिया सांडपाणी सोडले जाते, याविषयी ‘ब्र’ही काढत नाहीत !

विसर्जनाच्‍या पार्श्‍वभूमीवर सातारा येथील ६१ जणांवर प्रतिबंधात्‍मक कारवाई !

कारवाई करण्‍यात आलेल्‍या ६१ जणांना २७ ते २९ सप्‍टेंबर या दिवशी सकाळी १० वाजेपर्यंत सातारा तालुक्‍यात थांबण्‍यास प्रतिबंध करण्‍यात आला आहे, अशी माहिती शहर पोलिसांनी दिली.

पुणे येथे यावर्षीच्‍या श्री गणेशाच्‍या मूर्तींचा पुनर्वापर करून त्‍यापासून साकारणार पुढच्‍या वर्षीचे गणराय !

मुळात वहात्‍या पाण्‍यात विसर्जन करणे, हा श्री गणेशपूजनातील शेवटचा विधी आहे. असे असतांना प्राणप्रतिष्‍ठा केलेल्‍या मूर्ती विसर्जन न करता त्‍यांचा पुनर्वापर करणे हे अक्षम्‍य आहे आणि पुनर्वापरासाठी घेतलेल्‍या श्री गणेशमूर्तींची विक्री करण्‍याची अनुमती देणार्‍या अधिकार्‍यांवर कारवाई करावी असेच भाविकांना वाटते !

कोल्‍हापूर महापालिकेला भाविकांनी दान दिलेल्‍या श्री गणेशमूर्ती ओढ्यात टाकण्‍याचा प्रयत्न झाल्‍याने तणाव !

भाविकांनी श्रद्धेने दान दिलेल्‍या श्री गणेशमूर्तींची पुढे कशा प्रकारे विल्‍हेवाट लावली जाते ? याचे हे उत्तम उदाहरण आहे. त्‍यामुळे भाविकांनी श्री गणेशमूर्ती दान न देता शास्‍त्रानुसार नदीत विसर्जितच कराव्‍यात. त्‍यामुळे श्री गणेशमूर्तीची होणारी विटंबना तरी टळेल !

पुणे येथील मानाचे गणपति सायंकाळी ६ नंतर विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होतील !

अखिल मंडई मंडळ, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपति ट्रस्‍ट मंडळ, हुतात्‍मा बाबू गेणू गणपति मंडळ आणि श्री जिलब्‍या मारुति गणेश मंडळ ट्रस्‍ट ही पुणे येथील मानाची गणपति मंडळे सायंकाळी ६ वाजल्‍यानंतर विसर्जन मिरवणुकीमध्‍ये सहभागी होतील.

‘शाडू मातीच्‍या श्री गणेशमूर्ती विसर्जनामुळे प्रदूषण होते’, हे निवळ थोतांड असण्‍यामागील वैज्ञानिक कारणमीमांसा !

या लेखामध्‍ये निसर्ग, तसेच पशूपक्षी आणि मानव यांच्‍यासाठी हानीकारक, प्रसंगी जीवघेणे अशा विविध प्रकारच्‍या प्रदूषणांचा विचार केला आहे. तसेच हिंदूंचे आराध्‍य असलेल्‍या गणरायाच्‍या भावभक्‍तीने पुजलेल्‍या मूर्तीचे जलस्रोतात विसर्जन केल्‍याने प्रदूषण होते का ? यावर प्रकाश टाकण्‍यात आला आहे. सर्वसामान्‍य हिंदूंची कशी दिशाभूल होते आणि त्‍याला तो कसा फसतो ? ते या लेखातून लक्षात येईल.

प्रदूषणाच्या नावाखाली श्री गणेशमूर्ती दान करण्याचे आवाहन करणार्‍यांचे कुंभारांशी साटेलोटे ?

नदीच्या किनारी दान घेतलेल्या या श्री गणेशमूर्ती या ‘आयशर टेंपो’मधून कोल्हापूर, सांगली येथील कुंभारांना अगोदरच विकल्याची चर्चा जनमानसात आहे.

दान घेतलेल्या श्री गणेशमूर्ती बाजारात पुन्हा विक्रीस ठेवल्या जात असल्याने मूर्तीदान घेणार्‍या संस्थांवर महापालिकेने लक्ष ठेवावे ! – संतोष सौंदणकर, शिवसेना शहर संघटक

शास्त्रानुसार नैसर्गिक जलस्रोतात किंवा वहात्या पाण्यात श्री गणेशमूर्तींचे विसर्जन केल्यामुळे श्री गणेशमूर्तीतील गणेशतत्त्वे पाण्याद्वारे सर्वदूर पसरून चराचर सृष्टीला त्याचा लाभ होतो.