Anti-Hindu OTT Platforms : धर्महानी करणार्‍या ‘ओटीटी प्‍लॅटफॉर्म्‍स’वर अंकुश ठेवणारे परिनिरीक्षण मंडळ आवश्‍यक ! – ज्‍योत्‍सना गर्ग, महासचिव, ‘नेशन फर्स्‍ट कलेक्‍टिव्‍ह’

विदेशी संस्‍थांना हिंदु धर्म आणि संस्‍कृती नष्‍ट करायची असल्‍याने ते धर्म-संकृतीविरोधी चित्रपटांना अधिक प्रमाणात आर्थिक साहाय्‍य करतात. अशा चित्रपटांना सर्वांनी संघटित होऊन विरोध करणे आवश्‍यक आहे.

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवातील उद्बोधन सत्र : आध्यात्मिक संस्थांद्वारे धर्मजागृती !

नामजप आणि आध्यात्मिक ऊर्जा वाढवण्यासाठी आपण सनातन संस्थेच्या माध्यमातून प्रयत्न करायला हवा. सनातन संस्था करत असलेल्या कार्याची तुलना होऊ शकत नाही.

वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवशीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या सत्रात उद्बोधन करणार्‍या मान्यवरांचे सूक्ष्म परीक्षण

महाराजांची वाणी सात्त्विक असल्यामुळे ती कानाला मधुर वाटत होती. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना श्रोत्यांचे मन चटकन एकाग्र होऊन त्यांच्या मनावर धर्माचरणाचा विषय चांगल्या प्रकारे बिंबला.

‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली. 

मुलांना धर्मशिक्षण मिळण्यासाठी संतांनी पुढाकार घ्यावा ! – गुरु माँ भुवनेश्वरी पुरी, संस्थापक, श्रीकुलम् आश्रम आणि श्रीविद्या वन विद्यालय, उदयपूर, राजस्थान

काँन्व्हेंट किंवा खासगी शाळांमध्ये जाणार्‍या विद्यार्थ्यांना प्रामुख्याने धर्मशिक्षण देणे आवश्यक आहे; कारण त्यांना धर्मशिक्षण देण्याची कोणतीही व्यवस्था नाही. धर्मशिक्षणासह छोट्या-छोट्या गुरुकुलांची निर्मिती करायला हवी.

हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी युवकांनी शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक स्तरावर बलशाली झाले पाहिजे ! – प्रज्वल गुप्ता, अध्यक्ष, हिंदु जनसेवा समिती

धर्मामुळेच समाजाचे रक्षण होणार आहे. त्यामुळे हिंदूंना धार्मिक कार्यक्रमांतून जागृत करावे लागेल, असे प्रतिपादन श्री. प्रज्वल गुप्ता यांनी केले.

गोरक्षणाचे कार्य करतांना भगवंताने आमचे रक्षण केले ! – सतीश कुमार, राष्ट्रीय अध्यक्ष, गोरक्षा दल आणि राष्ट्रीय संघटनमंत्री, श्री हिंदू तख्त, पंजाब

गाय वाचली, तर जग वाचेल. सरकार त्याचे कार्य करणार आहे. आपल्याला राष्ट्र, धर्म आणि गोरक्षण यांचे कार्य करायचे असेल, तर लढावे लागणार आहे.

ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हलाल प्रमाणपत्राच्या इस्लामी अर्थव्यवस्थेला रोखा ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती, देहली

तीर्थक्षेत्रांच्या  ठिकाणी असलेल्या प्रसादाच्या दुकानांना ‘ॐ प्रतिष्ठान’ कडून ‘ॐ प्रमाणपत्र’ दिले जाणार आहे. ॐ प्रमाणपत्राच्या माध्यमातून हिंदूंनी हलाल प्रमाणपत्राला झटका द्यावा.

केरळमधील काँग्रेस आणि साम्यवादी सरकारला शबरीमला यात्रा होऊ द्यायची नाही ! –  टी.बी. शेखर, राष्ट्रीय अध्यक्ष, शबरीमला अयप्पा सेवा समाजम्

शबरीमला मंदिरातील भगवान अय्यपा हे ‘चिन्मय’ मुद्रेमध्ये आहेत. त्यामुळे मंदिराच्या परंपरेनुसार या मंदिरात १० वर्षांवरील आणि ५० वर्षांखालील वय असलेलल्या महिलांना प्रवेश निषिद्ध आहे.

काशी विश्वेश्वर मंदिराच्या मुक्तीसाठी कायदेशीर लढा देणार्‍या धर्मप्रेमींचा वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवात गौरव !

सद्गुरु नीलेश सिंगबाळ यांनी ग्रंथ भेट देऊन त्यांचा गौरव केला. या वेळी उपस्थित धर्मप्रेमींनी ‘बाबा विश्वनाथकी जय’, ‘नम: पार्वतीपते हर हर महादेव’ या घोषणा दिल्या.