वर्ष २०२४ मधील ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’च्या पहिल्या दिवशीच्या दुसर्‍या आणि तिसर्‍या सत्रात उद्बोधन करणार्‍या मान्यवरांचे सूक्ष्म परीक्षण

१. महामंडलेश्वर नर्मदा शंकरपुरीजी महाराज, निरंजनी आखाडा, जयपूर, राजस्थान.

 १ अ. सुश्री (कु.) मधुरा भोसले (आध्यात्मिक पातळी ६५ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. ‘महाराजांची वाणी सात्त्विक असल्यामुळे ती कानाला मधुर वाटत होती. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शन ऐकत असतांना श्रोत्यांचे मन चटकन एकाग्र होऊन त्यांच्या मनावर धर्माचरणाचा विषय चांगल्या प्रकारे बिंबला.

२. त्यांनी ‘दैनंदिन जीवनात अध्यात्म कसे जगायचे ?’, हा विषय सोप्या भाषेत सांगितल्यामुळे श्रोत्यांना याचे चांगल्या प्रकारे आकलन झाले.

३. त्यांच्यावर देवीची विशेष कृपा असल्याने ते धर्म आणि अध्यात्म यांचा प्रभावीपणे प्रसार करू शकतात.’

१ आ. श्री. राम होनप, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘स्वामींच्या मनात देवाविषयी पुष्कळ प्रेम आणि कृतज्ञता आहे.

२. स्वामी अध्यात्म सुलभ भाषेत प्रेमाने समजावून सांगत होते. त्यातून श्रोते अंतर्मुख होत होते.’

१ इ. श्री. निषाद देशमुख (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

१. ‘महाराजांमध्ये ‘मनमोकळेपणा’ आणि ‘नम्रता’, हे गुण आहेत.’

२. प.पू. डॉ. संतोष देवजी महाराज, संस्थापक, शिवधारा मिशन फाऊंडेशन, अमरावती, महाराष्ट्र.

२ अ. सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. ‘महाराजांमध्ये भगवंताप्रती पुष्कळ समर्पणभाव आणि भगवंताला अनुभवण्याची तीव्र तळमळ जाणवली.

२. हिंदु धर्माच्या कल्याणाच्या विचाराने प्रेरित होऊन ते ‘समाजकल्याणाचे कार्य ही ईश्वराच्या चरणांची सेवा आहे’, या समर्पितभावाने करत आहेत.

३. ते भावपूर्णरित्या कर्म करणारे कर्मयोगी संत असून चिंतन आणि मनन करून परिपूर्ण कर्म करतात. त्यामुळे त्यांच्या अनुयायांनाही भावपूर्ण कर्म करण्याची प्रेरणा मिळते.’

३. श्रीवास दास वनचारी, इस्कॉन, घाना, पश्चिम आफ्रिका.

३ अ. सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. ‘श्रीवास दास वनचारी हे धर्मासाठी तन, मन आणि धन अर्पण करून झोकून देऊन धर्मप्रसार करत आहेत.’

३ आ. श्री. राम होनप

श्री. राम होनप

१. ‘स्वामीजींची सनातन धर्मावर पुष्कळ श्रद्धा आहे. ते धर्माची सेवा ‘श्रीकृष्णाची सेवा’, या भावाने करतात.

२. स्वामीजी बोलत असतांना सभागृहात श्रीकृष्णाचे अस्तित्व जाणवत होते.’

३ इ. श्री. निषाद देशमुख

१. ‘स्वामीजी डोळे बंद करूनही उत्स्फूर्तपणे बोलत होते. त्या वेळी ‘ते देवाशी अनुसंधान ठेवून विषय मांडत आहेत’, असे जाणवले.

२. स्वामीजी इंग्रजीत बोलत होते. त्यामुळे अनेक श्रोत्यांना त्यांची भाषा कळत नसली, तर त्यांचे भाषण ऐकतांना श्रोत्यांवर सकारात्मक परिणाम होऊन त्यांचे मन शांत होत होते.

३. ते बोलत असतांना त्यांच्या वाणीत सात्त्विकता जाणवत होती. ‘ते खरे कर्महिंदू आहेत’, असे जाणवले.’

४. श्री. आचार्य राजेश्वर, राष्ट्रीय अध्यक्ष, संयुक्त भारतीय धर्मसंसद, राजस्थान.

४ अ. श्री. निषाद देशमुख

श्री. निषाद देशमुख

१. ‘श्री. आचार्य राजेश्वर यांच्यात धर्मरक्षणाची तळमळ आहे. त्यामुळे ते हिंदु समाजात जागृतीचे कार्य करत आहेत.’

४ आ. सुश्री (कु.) मधुरा भोसले

१. ‘त्यांनी हिंदु राष्ट्र-स्थापनेचे महत्त्व प्रभावीपणे सांगितले.

२. त्यांच्यात क्षात्रवृत्तीने धर्मरक्षण करण्याची तीव्र तळमळ आणि हिंदूंना जागृत करून त्यांचे संघटन करण्याचे कौशल्य आहे.’

४ इ. श्री. राम होनप

१. ‘त्यांच्या तेजस्वी वाणीमुळे श्रोत्यांना धर्मकार्याची प्रेरणा मिळत होती.’

सूक्ष्म-परीक्षण : एखाद्या घटनेविषयी किंवा प्रक्रियेविषयी चित्ताला (अंतर्मनाला) जे जाणवते, त्याला ‘सूक्ष्म-परीक्षण’ म्हणतात.