‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’ला उपस्थित हिंदुत्वनिष्ठांची रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट !

सनातनचा चैतन्यमय रामनाथी आश्रम

२४ ते ३० जून २०२४ या कालावधीत रामनाथी, गोवा येथे ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सव’ चालू आहे. या अधिवेशनात सहभागी झालेले संत आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिली अन् येथील कार्याची ओळख करून घेतली. 

अमेरिकेतील ‘इन्स्टिट्यूट ऑफ ॲडव्हान्स सायन्स’चे डॉ. नीलेश ओक (डावीकडे ) यांना सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरातील देवतांची माहिती सांगतांना साधक श्री. अमोल हंबर्डे
अखिल भारतीय संत समिती, धर्म समाजचे महाराष्ट्र प्रदेश प्रमुख महंत आचार्य पीठाधीश्वर डॉ. अनिकेत शास्त्री देशपांडे (डावीकडे) यांना ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांविषयी माहिती देतांना साधक श्री. अविनाश जाधव
मुंबईतील स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाच्या कोषाध्यक्षा मंजिरी मराठे यांना सात्त्विक कलाकृतींविषयी माहिती देतांना साधक श्री. रोहित साळुंखे