अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरल्या जाणार्‍या कॅनाबिसच्या लागवडीमध्ये गोव्यात वाढ

चरस, गांजा आदी अमली पदार्थ बनवण्यासाठी वापरला जाणारा प्रमुख घटक म्हणजे ‘कॅनाबिस’ ! या रोपांची लागवड आता गोव्यात केली जात आहे. अशा प्रकारची मागील एका वर्षात ८ प्रकरणेे उघडकीस आली, तर नोव्हेंबर २०२० या एका मासातच ४ प्रकरणे उघडकीस आली आहेत.

(म्हणे) ‘आंदोलनामध्ये बळाचा वापर करून ती दडपणे चुकीचे !’

देहलीत चालू असलेले शेतकर्‍यांचे आंदोलन सरकारने कुठेही दडपलेले नाही, उलट त्यांच्याशी आतापर्यंत ५ फेर्‍यांची चर्चा झालेली आहे. तरीही भारताची अपकीर्ती करण्यासाठी आणि दबाव निर्माण करण्यासाठी अशा प्रकारची विधाने संयुक्त राष्ट्रे आणि अन्य पाश्‍चात्त्य देश जाणीवपूर्वक करत आहेत, त्यांना समज देण्याची आवश्यकता आहे !

‘कोरोनाचे संकट संपेल’, असे स्वप्न जगाने पहाण्यास अडचण नाही ! – जागतिक आरोग्य संघटना

अनेक देशांमध्ये कोरोनाविरोधी लसींवर काम चालू आहे. काही ठिकाणी लस तिसर्‍या टप्प्यातही आहे. त्यांचे परिणाम पाहिले, तर आता आपण कोरोनाचे संकट संपेल, असे स्वप्न पहाण्यास अडचण नाही, असे मत जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक डॉ. टेंड्रोस घेब्रेयेसस यांनी व्यक्त केले आहे.

संयुक्त राष्ट्रांकडून हिंदु, शीख आणि बौद्ध धर्मियांवरील आक्रमणांकडे दुर्लक्ष ! – भारताची टीका

हिंदु, शीख आणि बौद्ध यांच्यावर पाक, अफगाणिस्तान येथे अनेक दशकांपासून अत्याचार होत असतांना संयुक्त राष्ट्र त्यावर आंधळी, बहिरी आणि मुकी असल्यासारखीच आहेत. त्यामुळे संयुक्त राष्ट्र संघाचा जगाच्या दृष्टीने आणि भारताच्या दृष्टीने काहीही लाभ नाही. अशी संघटना विसर्जित करणेच योग्य ठरेल !

इस्लामी देशांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा नाहीच !

पाकिस्तानचा काश्मीरच्या सूत्रावरून पुन्हा एकदा पराभव झाला आहे. पाकने इस्लामी देशांची संघटना ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’च्या (‘ओेआयसी’च्या) परराष्ट्रमंत्र्यांच्या बैठकीत काश्मीरच्या सूत्रावर चर्चा करण्याची मागणी केली होती.

पाक संयुक्त राष्ट्राने घोषित केलेल्या आतंकवाद्यांना आश्रय देतो ! – भारताची पाकवर टीका

पाकने संयुक्त राष्ट्रामध्ये खोटी कागदपत्रे असणारा अहवाल सादर केल्यावरून भारताने पाकवर टीका केली आहे. पाकने याद्वारे भारतावर पाकमध्ये आतंकवाद भडकावल्याचा आरोप केला आहे.

संयुक्त राष्ट्रांच्या ८६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण

संयुक्त राष्ट्रांच्या ८६ कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाली आहे. युरोपमध्ये असलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सर्वाधिक सदस्यांना त्याचा संसर्ग झाला आहे, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांचे प्रवक्ते स्टीफन दुजारीक यांनी दिली आहे.

२१ दिवसांच्या दळणवळण बंदीसाठी जागतिक आरोग्य संघटनेकडून भारताचे कौतुक

कोरोनाच्या विरोधात भारताचा लढा चालू आहे, त्यामध्ये आम्ही सुद्धा भारतासमवेत एकजुटीने उभे आहोत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी उचलण्यात आलेले हे अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल आहे, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्र आणि जागतिक आरोग्य संघटना यांच्याकडून भारताचे कौतुक करण्यात आले आहे.