इस्लामिक स्टेट पुन्हा सीरिया आणि इराक देशांमध्ये पाय रोवत आहे ! – भारताची संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेत चेतावणी

भारताने जगभरातील आतंकवादी संघटनांविषयी बोलण्याऐवजी भारतात होत असलेल्या जिहादी आतंकवादी कारवाया कशा नष्ट करण्यात येतील, याविषयी बोलले पाहिजे, तरच त्याचा देशाला काही तरी लाभ होऊ शकतो ! – संपादक

संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती

न्यूयॉर्क (अमेरिका) – इस्लामिक स्टेटने त्याच्या कार्यपद्धतीत पालट केले आहेत. त्याने सीरिया आणि इराक या देशांमध्ये पुन्हा एकदा पाय रोवण्याचा प्रयत्न चालू केला आहे. त्यामुळे जगाला सतर्क होण्याची आवश्यकता आहे, अशी चेतावणी भारताने संयुक्त राष्ट्रांच्या चर्चेच्या वेळी दिली. संयुक्त राष्ट्रांतील भारताचे राजदूत टी.एस्. तिरुमूर्ती यांनी ही चेतावणी दिली.

तिरुमूर्ती पुढे म्हणाले की, अल् कायदालाही अफगाणिस्तामध्ये पुन्हा भक्कम होण्याची संधी मिळाली आहे. लष्कर-ए-तोयबा आणि जैश-ए-महंमद यांसारख्या आतंकवादी संघटना अल् कायदाच्या संपर्कात राहून तिला बळ देत आहेत. या संघटना आफ्रिकेतील देशांमध्ये त्यांचा विस्तार करत आहेत.