रशिया-युक्रेन यांच्यातील तणाव न्यून करण्याला प्राधान्य द्यावे ! – भारत

रशिया-युक्रेन सीमावाद

टी.एस्. तिरुमूर्ती

न्यू यॉर्क (अमेरिका) – रशिया आणि युक्रेन यांच्यातील तणाव वाढणे, हा अत्यंत चिंतेचा विषय आहे. हा तणाव न्यून करण्याला त्वरित प्राधान्य दिले पाहिजे, अशी भूमिका संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेने तातडीने बोलावलेल्या बैठकीत भारताने मांडली.

भारताचे संयुक्त राष्ट्रांतील स्थायी प्रतिनिधी टी.एस्. तिरुमूर्ती म्हणाले, ‘‘सीमेवर सैन्य वाढणे, हे आमच्यादृष्टीने योग्यनाही. हा प्रश्‍न केवळ राजनैतिक संवादातूनच सोडवला जाऊ शकतो, याची आम्हाला शाश्‍वती आहे. या घडामोडींमुळे दोन्ही देशांतील शांतता आणि सुरक्षा बिघडू शकते.’’

युक्रेनमधील भारतियांना युक्रेनमधून बाहेर काढणे, हे आमचे प्राधान्य !

२० सहस्रांहून अधिक भारतीय विद्यार्थी आणि नागरिक युक्रेन अन् त्याच्या सीमावर्ती भागांत वेगवेगळ्या ठिकाणी रहातात. भारतियांना या परिस्थितीत सुरक्षित ठेवणे आणि तेथून बाहेर काढणे, हे आमचे प्राधान्य आहे. युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांना परत आणण्यासाठी ‘एअर इंडिया’चे विशेष विमान २२ फेब्रुवारीच्या सकाळी युक्रेनला मार्गस्थ झाले.