(म्हणे) ‘भारतातील मुसलमानांना संरक्षण द्या !’

हिजाब प्रकरणी इस्लामी देशांच्या संघटनेची मागणी

भारतातील अंतर्गत प्रश्‍नात अशा संघटनांनी नाक खुपसू नये, असे भारताने ठणकावले पाहिजे ! भारतातील धर्मांधांकडून हिंदूंवर प्रतिदिन होत असलेले अत्याचार या संघटनेला कधी दिसले नाहीत का ? काश्मीरमध्ये हिंदूंचा वंशसंहार करण्यात आला, तेव्हा ही संघटना कुठे होती ? याविषयी ती का बोलत नाही ? – संपादक

ओ.आय.सी.चे सरचिटणीस हुसेन इब्राहिम ताहिर

रियाध (सौदी अरेबिया) –  ‘ऑर्गनायझेशन ऑफ इस्लामिक कोऑपरेशन’ (ओ.आय.सी.) या इस्लामी देशांची संघटनेने भारताला ‘मुसलमानांना, महिलांना संरक्षण द्यावे’, अशी मागणी ओ.आय.सी.चे सरचिटणीस हुसेन इब्राहिम ताहिर यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केली. या प्रकरणी आवश्यक पावले उचलण्याचे आवाहनही त्यांनी संयुक्त राष्ट्रांकडे केले.

ताहिर यांनी ट्वीट करून हरिद्वार, उत्तराखंडमधील ‘हिंदुत्व’ समर्थकांकडून करण्यात आलेला मुसलमानांचा नरसंहार, सामाजिक माध्यमांतून मुसलमान महिलांचा होणारा छळ आणि कर्नाटकातील मुसलमान विद्यार्थिनींच्या हिजाबवर घालण्यात आलेली बंदी, यांविषयी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.