प्रथम तुम्ही दिलेली आश्‍वासने पूर्ण करा ! – संयुक्त राष्ट्रांनी तालिबान सरकारला सुनावले

संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरस

न्यूयॉर्क (अमेरिका) – मला अफगाणिस्तानमधील महिला आणि मुली यांची अधिक चिंता वाटते आहे. तालिबानींनी महिला आणि मुली यांना दिलेली आश्‍वासने पूर्ण केलेली नाहीत. त्यांनी दिलेले वचन मोडले आहे. माझे तालिबानी सरकारला कळकळीचे आवाहन आहे की, त्यांनी अफगाणिस्तानमधील महिला आणि मुली यांना दिलेले आश्‍वासन पाळावे, तसेच आंतरराष्ट्रीय मानवाधिकार अन् संबंधित कायद्यांच्या पार्श्‍वभूमीवर त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्यात, अशा शब्दांत संयुक्त राष्ट्रांचे प्रमुख अँटोनियो गुटेरस यांनी अफगाणिस्तानमधील तालिबान सरकारला सुनावले. तालिबानी सरकारच्या शिष्टमंडळाने प्रथमच अमेरिकेच्या सरकारशी प्रत्यक्ष चर्चा केल्यानंतर त्यावर गुटेरस यांनी संयुक्त राष्ट्रांची भूमिका मांडली आहे.