आंदोलन पुन्हा जोर धरणार या पार्श्वभूमीवर पोलिसांनी ११ जणांना केली अटक

प्रकल्प विरोधकांचा विरोध अद्यापही कायम असल्याचे दिसत आहे. अशातच ६ मे या दिवशी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे बारसू येथील ग्रामस्थांना भेटणार आहेत.

६ मे या दिवशी बारसू येथे प्रकल्‍पग्रस्‍तांची भेट घेणार ! – उद्धव ठाकरे

प्रकल्‍प करण्‍यापूर्वी स्‍थानिकांपुढे प्रकल्‍पाच्‍या आराखड्याचे सादरीकरण व्‍हायला हवे. बळजोरीने प्रकल्‍पाची उभारणी करण्‍यात येऊ नये. ६ मे या दिवशी बारसू येथे जाऊन प्रकल्‍पग्रस्‍तांची घेट घेणार आहे, अशी घोषणा उद्धव ठाकरे यांनी ४ मे या दिवशी पत्रकार परिषदेत केली.

६ मे या दिवशी तेलशुद्धीकरण प्रकल्प होण्यासाठी युतीचा मोर्चा : उद्धव ठाकरे आंदोलकांना भेटण्यासाठी बारसूत येणार

राजापूर तालुक्यातील बारसू-सोलगाव येथील प्रस्तावित तेलशुद्धीकरण प्रकल्पाच्या सूत्रावरून राजकारण तापत आहे. काही प्रकल्प समर्थकही ठाकरे यांची भेट घेणार आहेत.

गांधीनगर (जिल्हा कोल्हापूर) व्यापारपेठेमधील वाहतूक कोंडीवर उपाययोजना करा ! – राजू यादव, उद्धव बाळासाहेब ठाकरे गट

गांधीनगर व्यापार पेठेत वळीवडे कॉर्नर ते ‘चिंचवाड ट्रान्सपोर्ट लाईन’ रस्त्यावर अस्ताव्यस्त लावलेल्या वाहनांमुळे वाहतुकीची कोंडी होते.

‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार सोहळ्‍यातील मृत्‍यूंची उच्‍चस्‍तरीय चौकशी करा !

खारघर येथे झालेल्‍या ‘महाराष्‍ट्र भूषण’ पुरस्‍कार वितरण सोहळ्‍याला उपस्‍थित भाविकांतील १४ जणांचा मृत्‍यू झाला होता. याचे अन्‍वेषण करण्‍यासाठी सरकारने एक समिती गठीत केली आहे.

नागपूर येथे आमदार नितीन देशमुख यांची जलसंघर्ष यात्रा पोलिसांनी रोखली !

ठाकरे गटाचे आमदार नितीन देशमुख हे जलसंघर्ष यात्रा घेऊन येथील सीमेवर आले; मात्र पोलिसांनी त्यांची संघर्ष यात्रा धामना गावात अडवली. पोलिसांनी त्यांना कह्यात घेतले.

राज्यातील राजकारण नव्या वळणावर…?

मागील काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी अदानी, जेपीसी आणि मोदी यांची पदवी या ३ सूत्रांसंदर्भात उद्धव ठाकरे यांच्यापेक्षा वेगळी मते मांडली.

उद्धव ठाकरे यांच्या विरोधात मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करा ! – किरीट सोमय्या, नेते, भाजप

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि ‘लाइफलाईन’ आस्थापन यांच्या विरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा नोंद करण्यात यावा, अशी मागणी भाजपचे नेते, माजी खासदार किरीट सोमय्या यांनी शिवाजीनगर पोलिसांकडे केली.

रेशन दुकानांतून वितरित करण्यात येणारा तांदूळ खाण्यायोग्य आहे ! – अमोल पाठक, तहसीलदार, कुडाळ

‘फोर्टिफाइड’ तांदूळ हा नियमितचे तांदूळ आणि इतर पोषक पदार्थ एकत्र करून बनवला जातो. त्याचे पोषणमूल्य अधिक असून शारीरिक स्वास्थ्यासाठी शासनाने हा निर्णय घेतला आहे. (व्हिडिओ पहा)

केंद्रीय मंत्री नारायण राणे अलीबाग न्यायालयाकडून दोषमुक्त !

त्यांच्या विरोधात पुरेसे पुरावे उपलब्ध नसल्याने न्यायालयाने दोषमुक्त केले आहे. हा निर्णय अलीबाग मुख्य न्यायदंडाधिकार्‍यांनी दिला आहे.