विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर तातडीने मुंबईत उपस्थित !

विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर

मुंबई – विधानसभेचे अध्यक्ष परदेशात असल्यामुळे आमदारांच्या पात्र-अपात्रतेचा निर्णय घ्यावा, अशी मागणी उद्धव ठाकरे गटाच्या आमदारांनी विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरि झिरवाळ यांच्याकडे केली आहे. या पार्श्वभूमीवर इंग्लंडच्या दौर्‍यावर असलेले विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर मुंबईमध्ये तातडीने आले आहेत.

 (सौजन्य : ABP MAJHA)

उद्धव ठाकरे यांची साथ सोडलेल्या १६ आमदारांना अपात्र करावे, यासाठी ठाकरे गटाकडून उपाध्यक्ष झिरवाळ यांच्याकडे मागणी केली होती. सर्वाेच्च न्यायालयाने शिवसेनेचा पक्षप्रतोद म्हणून भरत गोगावले यांची नियुक्ती करतांना आवश्यक माहिती घेतली नसल्याचे नमूद केले होते, तसेच आमदारांच्या पात्र-अपात्रता यांविषयीचा निर्णय विधानसभेच्या अध्यक्षांना घेण्याचे निर्देश दिले आहेत.