काँग्रेसच्‍या आमदाराला ९९ रुपयांचा दंड !

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे छायाचित्र फाडल्‍याच्‍या प्रकरणी येथील न्‍यायालयाने काँग्रेसचे आमदार अनंत पटेल यांना ९९ रुपयांचा दंड ठोठावला. पटेल यांनी दंड भरला नाही, तर त्‍यांना ७ दिवसांचा कारावास भोगावा लागू शकतो.

जामिया मिलिया विद्यापीठ हिंसेप्रकरणी ९ धर्मांध मुसलमानांवर आरोपनिश्‍चिती !

वर्ष २०१९ मध्ये जामिया मिलिया इस्लामिया विद्यापिठासमोर झालेल्या हिंसेच्या प्रकरणी देहली उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय चुकीचा ठरवत ११ पैकी ९ आरोपींवर आरोपनिश्‍चिती केली आहे.

कुख्यात गुंड आणि समाजवादी पक्षाचा खासदार अतिक अहमद याला जन्मठेप !

१७ वर्षे जुन्या उमेश पाल अपहरण प्रकरणात मिळाली शिक्षा !

माजी आमदार अनिल भोसले यांचा जामीन पुन्‍हा फेटाळला !

विशेष न्‍यायाधीश आर्.एन्. हिवसे यांनी हा निकाल दिला. बँकेतील ४९६ कोटी ४४ लाख रुपयांच्‍या अपहारप्रकरणी भोसले यांच्‍यासह ७ जणांविरोधात दोषारोपपत्र प्रविष्‍ट केले आहे.

माध्यमांमुळे विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत आहे वाईट परिणाम !

सामाजिक माध्यमांच्या विरोधात अमेरिकेतील शैक्षणिक संस्थेची याचिका

केरळ येथील थिरूमंधमकुन्नू भगवती मंदिराच्या समितीवर मुसलमानांच्या नियुक्तीवरून उच्च न्यायालयात याचिका !

मुसलमान अथवा ख्रिस्ती यांच्या प्रार्थनास्थळांवर कधी कुणा हिंदूची नियुक्ती झाल्याचे ऐकिवात आहे का ? मुळात हिंदूंच्या धर्माभिमानशून्यतेमुळेच अशा घटना घडतात, हे जाणा !

उद्या संशयित आरोपी आंबेरकरच्या जामीन प्रकरणाची होणार सुनावणी !

राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या अपघातप्रकरणी संशयित आरोपी पंढरीनाथ आंबेरकर याने १ मार्च या दिवशी जामिनासाठी अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी पुढे ढकलण्यात आली होती. आता या जामीन अर्जावरील सुनावणी उद्या २८ मार्च या दिवशी होणार आहे.

आगरा येथे पोपटाने दिलेल्या सूचनेवरून पोलीस खुन्यांपर्यंत पोचले !

या प्रकरणी पोलिसांनी मृत महिलेच्या घरातील पोपटाच्या साक्षीवरून मारेकर्‍यांचा माग काढला होता. या हत्येतील एक दोषी महिलेचा नातेवाईक होता.

मुसलमानांना ४ विवाह करू देण्याच्या अनुमतीच्या विरोधात अलाहाबाद उच्च न्यायालयात याचिका !

न्यायालयाने केंद्र सरकारला बजावली नोटीस !

राहुल गांधी यांनी मानहानीच्या प्रकरणी ३ वेळा मागितली आहे क्षमा !

राहुल गांधी यांनी वर्ष २०१९ मध्ये ‘चौकीदार चोर है’ या विधानावरून न्यायालयाकडे ३ वेळा विनाअट क्षमा मागितलेली आहे. त्यामुळे ते शिक्षा होण्यापासून सुटले होते.