न्‍यायालयाचा पक्षपातीपणा ? कि विशेष वागणूक ?

हिंदूबहुल देशात धर्मांधांना लोकशाहीच्‍या चारही स्‍तंभांकडून विशेष वागणूक दिली जाणे, हे हिंदूंना लज्‍जास्‍पद !

प्रत्येक मुलीला तिच्या वडिलांकडून विवाहाचा खर्च मिळवण्याचा अधिकार ! – केरळ उच्च न्यायालय

मग ती कोणत्याही धर्माची असो, असे केरळ उच्च न्यायालयाने एका खटल्याच्या सुनावणीच्या वेळी म्हटले आहे.

लैंगिक अत्याचार सिद्ध करण्यासाठी पीडितेच्या तपासणीमध्ये वीर्य आढळणे आवश्यक नाही ! – आंध्रप्रदेश उच्च न्यायालय

पीडितेच्या अंतर्गत अवयवांना दुखापत झाली असून हा तिच्यावर झालेल्या लैंगिक अत्याचाराचा पुरावा आहे. हा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरतांना असे म्हटले आहे. हा नियम विशेषतः ‘पॉक्सो’ कायद्याच्या कार्यवाहीच्या वेळी लागू होतो.

नांदेड येथील माजी आमदार अनुसया खेडकर यांच्‍यासह शिवसैनिकांचा जामीन संमत !

वर्ष २००८ मध्‍ये राज्‍यात काँग्रेस-राष्‍ट्रवादी काँग्रेसचे सरकार असतांना महागाईच्‍या विरोधात हे आंदोलन करण्‍यात आले होते. यात आंदोलक आमदार खेडकर आणि अन्‍य जवळपास १५० जणांना पोलिसांनी कह्यात घेतले होते,

ज्ञानवापीशी संबंधित सर्व ७ प्रकरणांची एकत्रित सुनावणी होणार

ज्ञानवापी आणि शृंंगार गौरी प्रकरणातील ७ याचिकांवर एकत्र सुनावणी करण्याचा न्यायालयाचा आदेश ! शृंगार गौरीच्या प्रकरणी वादी असणार्‍या लक्ष्मी देवी, सीता साहू, मंजू व्यास आणि रेखा पाठक यांनी अर्ज करून ही मागणी केली होती.

भूमीच्या वादातून थोरल्या भावाकडून सख्ख्या धाकट्या भावाची हत्या

वडिलोपार्जित भूमीवरून न्यायालयात चालू असलेल्या खटल्याच्या पार्श्‍वभूमीवर कोरेगाव तालुक्यातील किन्हईजवळ गणेशवाडी येथे थोरल्या भावाने सख्ख्या धाकट्या भावाची हत्या केली. 

चंद्रपूर जिल्हाधिकार्‍यांचा मद्याची दुकाने बंद करण्याचा आदेश उच्च न्यायालयाकडून रहित !

चंद्रपूर लिकर असोसिएशनचे अध्यक्ष राजू मारकवार यांनी उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात याचिका प्रविष्ट करून जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशाला आव्हान दिले. त्यानंतर उच्च न्यायालयातील न्यायमूर्ती खंडपिठाने आदेशाला स्थगिती देत आदेश रहित ठरवला आहे

टँकर लॉबीत राजकीय नेत्यांची सक्रीय भूमिका पडताळून पहावी !

नवीन १ सहस्र ६८० कोटी रुपये निधीच्या नवीन पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण होईपर्यंत विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांचे स्थानांतर करू नये, असा आदेशही खंडपिठाने दिला आहे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांचे नातू सात्यकी सावरकर यांच्याकडून राहुल गांधी यांच्या विरोधात मानहानीचा दावा प्रविष्ट !

माझे आजोबा स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी राहुल गांधी यांनी त्यांच्या भाषणात केलेल्या खोट्या आरोपांमुळे सावरकरांची अपकीर्ती झाली आहे.

भारतीय संस्कारांच्या परिवर्तनाचा न्यायालयाच्या निवाड्यावर होत असलेला परिणाम !

भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सर्वपक्षीय शासनकर्त्यांनी शाळा-महाविद्यालयांमधून मुलांना चांगले संस्कार दिले नाहीत. यासमवेतच एकत्र कुटुंब पद्धतीचा र्‍हास होत गेल्याने त्यांना घरातही चांगले संस्कार मिळाले नाहीत. त्यातून या समस्या निर्माण होत आहेत.’