नाशिक येथे अनधिकृत वृक्षतोड केल्याप्रकरणी न्यायालय प्रशासनाला १ लाख रुपये दंडाची नोटीस !
नाशिक जिल्हा न्यायालयाच्या आवारात असलेल्या चिंचेच्या वृक्षाची विनाअनुमती छाटणी करण्यात आली. त्यासाठी महापालिकेच्या उद्यान आणि वृक्ष प्राधिकरण विभागाने न्यायालय प्रशासनाला १ लाख रुपयापर्यंतची दंडाची नोटीस बजावली आहे.