Brutal Murder Hindu Saint : स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती यांच्या हत्येची चौकशी सीबीआयला का देऊ नये ?

ओडिशा उच्च न्यायालयाचा ओडिशा सरकारला नोटीस बजावून विचारला प्रश्‍न  !

ओडिशा उच्च न्यायालय

भुवनेश्‍वर (ओडिशा) – ओडिशातील कंधमाल येथे २३ ऑगस्ट २००८ या दिवशी माओवाद्यांनी स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती आणि त्यांचे ४ शिष्य यांची हत्या केली होती. या प्रकरणी आता ओडिशा उच्च न्यायालयाने सरकारला ‘या हत्येची चौकशी सीबीआयला का देऊ नये ?’, अशी विचारणा केली आहे. यासाठी ५ मार्च २०२४ पर्यंतची मुदत देण्यात आली आहे. स्वामी लक्ष्मणानंद सरस्वती कंधमाल येथे धर्मांतरित हिंदूंना हिंदु धर्मात परत घेण्यासह आदिवासींच्या कल्याणासाठी काम करत होते.

संपादकीय भूमिका

  • वर्ष २००८ मध्ये झालेल्या हत्येची चौकशी १५ वर्षांनंतरही पूर्ण न होणे, हे ओडिशातील बीजू जनता दल सरकारला लज्जास्पद !