|
पुणे – डॉ. दाभोलकर यांच्या हत्येप्रकरणी अटकेत असलेले शरद कळसकर आणि सचिन अंदुरे यांच्या बहिणींची येथील न्यायालयात साक्ष झाली. दाभोलकरांची हत्या झाली, त्या दिवशी रक्षाबंधन होते. त्यामुळे रक्षाबंधनाच्या दिवशी शरद कळसकर छत्रपती संभाजीनगरला, तर सचिन अंदुरे अकोला येथे त्यांच्या त्यांच्या बहिणींसमवेत होते, अशी साक्ष त्या दोघांच्या बहिणींनी दिली.
सीबीआयच्या अधिवक्त्यांनी साक्षीदारांची उलटतपासणी पुढील तारखेला घेण्यासंबंधी न्यायालयात विनंती केली. त्याप्रमाणे १६ जानेवारीला खटल्याची पुढील सुनावणी होणार आहे. पी.पी.जाधव यांच्या न्यायालयात ही साक्ष झाली. आरोपींच्या बाजूने अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी काम पाहिले.
दाभोलकर हत्या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत २० साक्षीदार सादर केले होते. त्यांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे. मागील सुनावणीच्या वेळी न्यायालयाने आरोपींना ३०० पेक्षा अधिक प्रश्न विचारले होते.