ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या ग्रामविकास मंत्रालयात त्यांच्या जावयाचा १ सहस्र ५०० कोटी रुपयांचा घोटाळा ! – किरीट सोमय्या, माजी खासदार

किरीट सोमय्या यांनी २८ सप्टेंबर या दिवशी मुरगुड पोलीस ठाण्यात ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या विरोधात तक्रार प्रविष्ट केली. माझ्या जावयाने घोटाळा केल्याचा किरीट सोमय्या यांचा आरोप खोटा ! – हसन मुश्रीफ

नजरकैदेत ठेवल्यास सचिन वाझे पळून जाण्याची शक्यता ! – अन्वेषण यंत्रणा

हृदयाचे शस्त्रकर्म झाल्यामुळे बरे होईपर्यंत त्यांच्या घरी नजरकैदेत ठेवण्याची मागणी वाझे यांनी विशेष न्यायालयाकडे केली आहे. याला राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेने विरोध दर्शवला असून २७ सप्टेंबर या दिवशी न्यायालयाकडे त्यांनी वरील भूमिका मांडली आहे.

देहलीमधील दंगल पूर्वनियोजित ! – देहली उच्च न्यायालय

देहली दंगलच नव्हे, तर भारतात धर्मांधांकडून घडवण्यात येणार्‍या सर्व दंगली या पूर्वनियोजित असतात आणि नेहमीच त्या क्षुल्लक कारणावरून घडवल्या जातात, हे लक्षात घ्या !

अधिकार्‍यांनी न्यायालयाच्या अवमानाची काळजी न करता काम करावे ! – त्रिपुराचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब

तृणमूल काँग्रेसचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी म्हटले की, देब यांनी निर्लज्जपणे लोकशाहीची थट्टा केली आहे. त्यांनी सन्माननीय न्यायव्यवस्थेची जाहीरपणे चेष्टा केली आहे.

बलात्कार पीडितेवर अन्याय करणारा गोहत्ती उच्च न्यायालयाचा निवाडा !

देशातील महिलांना सुरक्षित जीवन आणि योग्य सन्मान मिळवून देण्यासाठी हिंदु राष्ट्रच हवे !

अधिकार्‍यांनी न्यायालयाच्या अवमानाची काळजी न करता काम करावे ! – त्रिपुराचे भाजप सरकारचे मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब

या भाषणाचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर विरोधी पक्षांकडून टीका केली जात आहे.

‘सामाजिक माध्यमांवरून धर्माविषयीची आक्षेपार्ह ‘पोस्ट’ काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही’, हे पोलिसांना कळत कसे नाही ?

‘सामाजिक माध्यमांवर कुठल्याही धर्माविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे ‘सामाजिक माध्यमांवरून अशी पोस्ट काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही.

घरीच स्थानबद्ध करण्याच्या सचिन वाझे यांच्या मागणीवर अन्वेषण यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश !

हृदयावरील शस्त्रकर्म झाले असल्यामुळे प्रकृती ठीक होईपर्यंत घरी स्थानबद्ध ठेवण्याच्या सचिन वाझे यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. सचिन वाझे यांनी याविषयीचा अर्ज न्यायालयात केला आहे.

टोळीयुद्धे कधी थांबणार ?

‘गोळीबारासारख्या घटना न्यायालयांत वारंवार होतात; मात्र पोलीस त्यावर ठोस उपाययोजना काढत नाहीत’, असे अधिवक्त्यांचे म्हणणे आहे, जे की अत्यंत चिंताजनक आहे.

पुण्यात ‘ई-चलना’द्वारे वाहतूक पोलिसांनी आकारलेला दंड भरण्यास नागरिकांची न्यायालयात गर्दी !

ई-चलन भरण्यासाठी नागरिकांनी न्यायालयात सकाळपासून गर्दी केली होती; परंतु दंडाचे प्रकरण निकालात काढण्यासाठी पुरेसे कर्मचारी उपलब्ध नसल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागत होता.