घरीच स्थानबद्ध करण्याच्या सचिन वाझे यांच्या मागणीवर अन्वेषण यंत्रणेला भूमिका स्पष्ट करण्याचे न्यायालयाचे निर्देश !

सचिन वाझे

मुंबई – हृदयावरील शस्त्रकर्म झाले असल्यामुळे प्रकृती ठीक होईपर्यंत घरी स्थानबद्ध ठेवण्याच्या सचिन वाझे यांच्या मागणीवर भूमिका स्पष्ट करण्याचा आदेश मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने दिला आहे. सचिन वाझे यांनी याविषयीचा अर्ज न्यायालयात केला आहे. या प्रकरणी आता राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेला न्यायालयात भूमिका स्पष्ट करावी लागणार आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या घराबाहेरील गाडीत जिलेटिनच्या कांड्या मिळाल्याचे प्रकरण आणि त्या गाडीचे मालक मनसुख हिरेन यांच्या मृत्यूच्या प्रकरणी गुन्हे अन्वेषण शाखेचे साहाय्य पोलीस निरीक्षक सचिन वाझे यांना निलंबित करून त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडून या प्रकरणाचा शोध चालू आहे.