महिलेकडे वाकड्या दृष्टीने पहाण्याचे धैर्य होऊ नये, अशी कठोर शिक्षा आरोपींना व्हायला हवी ! – सौ. पंकजा मुंडे-पालवे, भाजप

आपल्या राज्यात, देशात आणि संस्कृतीत महिलांना पूजनीय स्थान देण्यात आले आहे. महिला अत्याचारातील घटनांमध्ये शिक्षेचे प्रमाण वाढायला हवे. ‘अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्यास आरोपीला देहदंडाची शिक्षा करावी’, अशी मागणी आम्ही लावून धरली; पण आजचे चित्र विदारक आहे..

हिंदुत्वनिष्ठ नेते प्रीत सिंह यांना जामीन संमत

जंतर मंतरवर ऑगस्ट मासामध्ये ‘भारत जोडो आंदोलन’च्या वेळी मुसलमानांच्या विरोधात कथित आक्षेपार्ह घोषणा दिल्याच्या प्रकरणी अटक करण्यात आलेले ‘सेव्ह इंडिया फाऊंडेशन’चे अध्यक्ष प्रीत सिंह यांची न्यायालयाने जामिनावर सुटका केली आहे.

केरळ उच्च न्यायालयाने लक्षद्वीपच्या शाळांमधील माध्यान्ह भोजनातून मांसाहारी पदार्थ हटवण्याच्या विरोधात केलेली याचिका फेटाळली !

आता साम्यवादी, निधर्मी आदींनी न्यायालयाचे भगवेकरण झाल्याचा आरोप करण्यास आरंभ केल्यास आश्चर्य वाटू नये !

काश्मिरी नेते सुशील पंडित यांच्यावरील गुन्हा रहित !

देहलीमध्ये २१ मे २०१८ या दिवशी एका संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यात एका नेत्याने काश्मीरच्या बारामुला येथे आतंकवाद्यांच्या आक्रमणात ५ सैनिक हुतात्मा झाल्याचे सांगितल्यावर काश्मिरी नेते सुशील पंडित यांनी ट्वीट केले होते.

श्री साईबाबा संस्थानच्या प्रशासकीय अधिकार्‍यांसह ६ जणांना अटक !

शिर्डी येथील श्री साईबाबा संस्थानची सामाजिक माध्यमांतून अपर्कीती केल्याचे प्रकरण, मंदिरांच्या विश्वस्त मंडळावर केवळ भक्तांचीच नियुक्ती करणे आवश्यक !

महंत नरेंद्र गिरि यांचा गुदमरल्यामुळे मृत्यू

अखिल भारतीय आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरि यांच्या ५ डॉक्टरांकडून करण्यात आलेल्या शवविच्छेदनानंतरच्या अहवालानुसार, त्यांचा मृत्यू गुदमरल्यामुळे झाला आहे. त्यांच्या गळ्याला गळफासाचे निशाण आणि ‘व्ही’ आकार प्राप्त झाला आहे.

दंडाधिकारी न्यायालय पक्षपाती असून त्याच्यावर माझा विश्वास नाही ! – कंगना राणावत, अभिनेत्री

राणावत यांचे अधिवक्ता रिझवान सिद्दिकी यांनी न्यायालयात सांगितले की, आमच्या अशिलास या न्यायालयात प्रकरण पुढे चालू ठेवायचे नाही. आम्ही ‘चिफ मेट्रोपॉलिटन मॅजिस्ट्रेट’च्या न्यायालयात अर्ज केला आहे.

राज कुंद्रा यांची ५० सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता !

अश्लील चित्रपट निर्मितीच्या प्रकरणात अटक करण्यात आलेले उद्योजक राज कुंद्रा यांची न्यायालयाने ५० सहस्र रुपयांच्या जामिनावर मुक्तता केली आहे.

नवरात्रोत्सवामध्ये श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची उंची ४ फुटांपर्यंत मर्यादित ठेवण्याच्या शासनाच्या आदेशामध्ये हस्तक्षेप करण्यास ओडिशा उच्च न्यायालयाचा नकार !

श्री दुर्गादेवीची ८ फुटांपर्यंतची मूर्ती बनवण्याची मागणी करणारी याचिका बालू बाजार पूजा कमिटीकडून न्यायालयात प्रविष्ट करण्यात आली होती.

गोहत्या प्रकरणामध्ये अलाहाबाद उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन फेटाळला !

अलाहाबाद उच्च न्यायालयाने अलीकडेच एका गोहत्या प्रकरणातील आरोपीला जामीन देण्यास नकार दिला होता. त्यावेळी न्यायालयाने म्हटले होते, ‘आम्हाला ठाऊक आहे की, जेव्हा एखाद्या देशाची श्रद्धा आणि संस्कृती यांना धक्का पोहोचतो, तेव्हा देश दुर्बल होतो.’