‘सामाजिक माध्यमांवरून धर्माविषयीची आक्षेपार्ह ‘पोस्ट’ काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही’, हे पोलिसांना कळत कसे नाही ?

उच्च न्यायालय नागपूर खंडपिठ

‘सामाजिक माध्यमांवर कुठल्याही धर्माविषयी आक्षेपार्ह ‘पोस्ट’ प्रसारित करून समाजात तेढ निर्माण करणे, हा गंभीर स्वरूपाचा गुन्हा आहे. त्यामुळे ‘सामाजिक माध्यमांवरून अशी पोस्ट काढून टाकली, तरी त्या संदर्भातील गुन्हा रहित करता येणार नाही. त्याविषयी पोलिसांनी अन्वेषण करून खटला चालवणे आवश्यक आहे’, असे मत मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठाने व्यक्त केले.’