|
नवी देहली – राजधानी देहलीमध्ये गेल्या वर्षी फेब्रुवारी मासामध्ये झालेली दंगल कोणत्याही घटनेची प्रतिक्रिया नव्हती, तर ती पूर्वनियोजित पद्धतीने करण्यात आली होती, असे देहली उच्च न्यायालयाने म्हटले आहे. ही दंगल नागरिकत्व सुधारणा कायद्याचा विरोध करण्यासाठी म्हणून घडवण्यात आली होती. यात ५३ जणांचा मृत्यू झाला होता.
Delhi riots 2020 pre-meditated conspiracy, did not take place in spur of the moment: High Court https://t.co/JdR6ERJEPZ
— TOI Delhi (@TOIDelhi) September 27, 2021
१. न्यायालयाने म्हटले की, तक्रारदारांनी न्यायालयात सादर केलेल्या व्हिडिओनुसार त्यात आंदोलकांची वर्तणूक स्पष्टपणे दर्शवते की, ही दंगल सरकार आणि शहरातील लोकांचे सामान्य जीवन विस्कळीत करण्यासाठी पूर्वनियोजन करून घडवण्यात आली होती. दंगलखोरांनी सीसीटीव्ही कॅमरे बंद करणे, हे शहरातील कायदा आणि सुव्यवस्था बिघडवण्याच्या पूर्वनियोजित षड्यंत्राची पुष्टी करते. दंगलखोरांनी पोलीस अधिकार्यांवर लाठ्यांनी निर्दयीपणे आक्रमण केल्याचेही स्पष्ट झाले आहे. ही दंगल अचानक घडली नसून तो पूर्वनियोजित कट होता.
२. या दंगलीत आरोपी महंमद इब्राहिम हातात तलवार घेऊन होता. या घटनेत धारदार शस्त्रांमुळे पोलीस हवालदार रतनलाल यांचा मृत्यू झाला होता. या संदर्भात इब्राहिमच्या अधिवक्त्यांनी युक्तीवाद केला होता की, पोलीस हवालदार रतनलाल यांचा मृत्यू त्याच्या जखमांविषयीच्या अहवालात नमूद केल्याप्रमाणे तलवारीने झालेला नाही. आरोपीने केवळ स्वतःची आणि कुटुंबाची सुरक्षा करण्यासाठी तलवार उचलली होती.
३. यावर न्यायालयाने म्हटले की, आरोपीच्या हातातील शस्त्र हे न्यायालयाला आरोपीच्या तुरुंगवासाची मुदत वाढवण्याचा निर्णायक पुरावा आहे. त्याने वापरलेल्या शस्त्रामुळे गंभीर दुखापत किंवा मृत्यू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याला जामीन दिला जाऊ शकत नाही.