|
ओटावा (कॅनडा) – कॅनडाचे काळजीवाहू पंतप्रधान जस्टिन ट्रुडो यांनी १५५ अब्ज डॉलर (२ लाख १७ सहस्र कोटी रुपये) किमतीच्या अमेरिकेच्या आयातीवर २५ टक्के शुल्क लागू करण्याची घोषणा केली. तसेच मेक्सिकोनेही अशाच प्रकारचे शुल्क लावण्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डॉनल्ड ट्रम्प यांनी पदाची शपथ घेतल्यानंतर कॅनडा आणि मेक्सिको या देशांवर २५ टक्के शुल्क लावण्याचा निर्णय घेतल्यानंतर कॅनडाने हे पाऊल उचलले आहे.
१. ट्रुडो यांनी सांगितले की, ३० अब्ज डॉलर किमतीच्या अमेरिकी वाईन आणि फळे यांंच्या आयातीवरील नवीन दर ४ फेब्रुवारीपासून लागू होतील, तर १२५ अब्ज डॉलर किमतीच्या आयातीवरील शुल्क नंतर लागू होतील.
२. मेक्सिकोच्या राष्ट्राध्यक्षा क्लॉडिया शेनबॉम यांनी सांगितले की, अर्थमंत्र्यांना अमेरिकेवर शुल्क लागू करण्याचे निर्देश दिले आहेत. शुल्क आकारून समस्या सुटत नाहीत, तर सहकार्याने सुटतात. मेक्सिकोला संघर्ष नको आहे. आम्ही सहकार्याने प्रारंभ करतो.