थकीत मालमत्ता कर वसुली मोहिम तीव्र
पुणे – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या करसंकलन विभागाकडून शहरातील २१ शाळा, १४ खासगी रुग्णालये आणि ३५ हॉटेल यांची मालमत्ता लाखबंद (सील) करून त्यांच्यावर जप्तीची कारवाई करण्यात येत आहे. मालमत्ताधारकांनी अनेक वर्षे कर भरणा न केल्याने कोट्यवधीची थकबाकी आहे. १ लाखांपेक्षा अधिक थकबाकी असलेल्या बिगरनिवासी मालमत्ता लाखबंद करून जप्त केल्या जात आहेत. नोटिसांनाही प्रतिसाद न देणार्या मालमत्ता जप्त करण्यात येत आहेत. मुदतीमध्ये थकबाकी न भरल्यास त्या मालमत्तांचा लिलाव करण्यात येईल. यांत वर्षानुवर्षे कर भरणा न केलेल्या शिक्षण संस्था आणि खासगी रुग्णालये यांचा समावेश आहे. (करभरणा करण्यासाठी एवढी वर्षे का वाट पाहिली जाते ? वेळीच कारवाई का होत नाही ? – संपादक)
करसंकलन विभागाचे साहाय्यक आयुक्त अविनाश शिंदे म्हणाले की, वर्षानुवर्षे लाखो रुपयांची मालमत्ता कर थकबाकी असणार्या संबंधितांना नोटीस देऊनही थकबाकी भरली जात नाही. चालू वर्षी या मालमत्ताधारकांना जप्तीपूर्व नोटीस देऊन थकबाकी न भरल्यास त्यांची मालमत्ता लाखबंद करण्यात येत आहे. (वारंवार नोटीस देऊनही उत्तर न देणार्यांना कायद्याचे भय नाही. त्यांच्यावर आतापर्यंत जप्तीची कारवाई करून त्यांच्या मालमत्तेचा लिलाव होणे अपेक्षित होते. वेळीच निर्णय न घेतल्यामुळे कर चुकवणार्यांची संख्या वाढत आहे ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|