येरवडा स्मशानभूमीत अंत्यविधीसाठी लवकर क्रमांक लावण्यासह अस्थी परत देण्यासाठी पैशांची मागणी

समाजातील नैतिकता आणि माणुसकी हरवत चालल्याचे दर्शवणारी घटना ! मढ्याच्या टाळूवरचे लोणी खाणार्‍या असंवेदनशील कर्मचार्‍यांवर आणि त्याकडे दुर्लक्ष करणार्‍या अधिकार्‍यांवर प्रशासनाने तात्काळ कारवाई करावी !

मिरज तालुक्यातील शिवकालीन वटवृक्ष वाचवण्यात यश

मिरज तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध यल्लम्मा मंदिराजवळ ४०० वर्षांपूर्वीचा म्हणजे शिवकालीन वटवृक्ष आहे. हा वटवृक्ष तोडण्यात येणार होता. आराखड्यात पालट करून वृक्षाचे रक्षण होऊ शकते, असे निदर्शनास आले. त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.

कोरोनामुळे झालेली परिस्थिती आता सुधारेल ! – नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट

कोरोनामुळे जितकी वाईट परिस्थिती यायची होती, ती येऊन गेली आहे. आता परिस्थिती सुधारेल, असा दावा नोबेल पुरस्कार विजेते मायकल लॅविट ‘लॉस एंजिल्स टाइम्स’ला दिलेल्या मुलाखतीत केला.

मंगल भवन अमंगल हारी…

२१ दिवस घरी बसून काय करायचे?, हा प्रश्‍न सर्वांसमोर असतांना कोणी भल्या माणसाने ‘रामायण’ आणि ‘महाभारत’ या मालिका दाखवण्याची शासनाकडे विनंती केली अन् ती मान्यही झाली.

बिहार शासन प्रत्येक कुटुंबाला १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार

कोरोनामुळे संपूर्ण देशात दळणवळण बंदी करण्यात आल्याने मजुरी करणार्‍यांचा आणि काम गमावलेल्या लोकांच्या कुटुंबांना बिहार शासन प्रत्येकी १ सहस्र रुपयांचे अर्थसाहाय्य करणार आहे.

अमेरिकेत शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी सिद्ध केले लंगर (अन्नदान)

अमेरिकेत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे अनेक वैद्यकीय कर्मचारी रात्रं-दिवस झटत आहेत. अशा कर्मचार्‍यांना साहाय्य म्हणून आणि खाण्या-पिण्याची सोय व्हावी, यासाठी शीख समाजाने ३० सहस्र वैद्यकीय कर्मचार्‍यांसाठी लंगर (अन्नदान) म्हणून खाद्यपदार्थांची पाकिटे सिद्ध केली आहेत.

कोरोना आणि पाळीव प्राण्यांची समस्या !

सध्या कोरोना विषाणूने संपूर्ण जगभर धुमाकूळ घातला आहे. नागरिक एकीकडे काळजी घेत आहेत, तर दुसरीकडे लोकांमधील स्वार्थी वृत्ती, निष्काळजीपणा दिसून येत आहे. असाच प्रकार आता सातारा शहरात पहायला मिळत आहे.

सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासाठी तळेगाव पोलिसांकडून भाजीमंडईमध्ये एक मीटर अंतरावर चौकोनी पट्टे

जनहो, स्वयंशिस्त पाळा ! पोलीस-प्रशासनाचा वेळ छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाया घालवू नका !

पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर आक्रमण करणार्‍यांवर गुन्हे नोंदवण्यात येतील ! – अजित पवार, उपमुख्यमंत्री

कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी कर्तव्य बजावणारे पोलीस, वैद्यकीय अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावरील आक्रमणाच्या घटना कदापि सहन केल्या जाणार नाहीत. अशी आक्रमणे करणार्‍यांवर गुन्हे नोंदवून कायदेशीर कारवाई केली जाईल

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर नाशिक येथे वाहनांना मर्यादित इंधन

नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या हेतूंनी येथील जिल्हाधिकार्‍यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने खासगी वाहने वापरणार्‍यांची संख्या अधिक आहे.