मिरज तालुक्यातील शिवकालीन वटवृक्ष वाचवण्यात यश

मिरज- तालुक्यातील भोसे येथील प्रसिद्ध यल्लम्मा मंदिराजवळ ४०० वर्षांपूर्वीचा म्हणजे शिवकालीन वटवृक्ष आहे. रत्नागिरी-नागपूर या महामार्गाच्या कामासाठी हा वटवृक्ष तोडण्यात येणार होता. या विरोधात काही दिवसांपासून ग्रामस्थ आणि वृक्षप्रेमी यांनी आंदोलन चालू केले होते. केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या सूचनेनुसार २४ जुलै या दिवशी सकाळी राष्ट्रीय महामार्गाच्या अधिकार्‍यांनी पहाणी करून वृक्ष वाचवण्याविषयी चर्चा केली. सध्याच्या कामातील आराखड्यात पालट करून वृक्षाचे रक्षण होऊ शकते, असे निदर्शनास आले. याविषयीचा प्रस्ताव तातडीने मान्य केला असून त्याची कार्यवाही करण्याचा निर्णय घेण्यात आला.