सुरक्षित सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्सिंग) राखण्यासाठी तळेगाव पोलिसांकडून भाजीमंडईमध्ये एक मीटर अंतरावर चौकोनी पट्टे

जनहो, स्वयंशिस्त पाळा ! पोलीस-प्रशासनाचा वेळ छोट्या छोट्या गोष्टींसाठी वाया घालवू नका !

पिंपरी-चिंचवड – कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून गर्दी न करण्याचे आवाहन करण्यात येत आहे; परंतु त्याचे पालन होतांना दिसत नाही. तळेगाव पोलीस ठाण्याच्या परिसरात भाजी विक्रेत्यांकडे गर्दी होत आहे. यावर उपाययोजना म्हणून पोलिसांनी भाजीविक्रेत्यांसमोर एकेका मीटरवर पांढरे चौकोनी पट्टे ओढले आहेत. ग्राहकांना त्या चौकोनातच उभे रहाण्यासाठी आग्रह करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांमध्ये किमान आवश्यक अंतर राखले जात आहे.