नाशिक – नागरिकांनी घराबाहेर पडू नये आणि कोरोनाचा संसर्ग वाढू नये, या हेतूंनी येथील जिल्हाधिकार्यांनी इंधन पुरवठ्यावर निर्बंध आणले आहेत. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था बंद असल्याने खासगी वाहने वापरणार्यांची संख्या अधिक आहे. त्यामुळे वरील निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार आता दुचाकीस्वारांना १०० रुपयांचे पेट्रोल, तर चारचाकी वाहनांना अधिकाधिक एक सहस्र रुपयांचे इंधन देण्यात येईल. काही जण वेगवेगळ्या पेट्रोल, डिझेल पंपांवर जाऊन निर्णयाचे उल्लंघन करू शकतात. अशा व्यक्तींवर लक्ष ठेवण्यासाठी डिजिटल यंत्रणा कार्यान्वित केली जाणार आहे. या यंत्रणेच्या माध्यमातून नियम मोडण्याचा प्रयत्न करणार्यांच्या विरोधात कलम १८८ आणि १४४ अंतर्गत कारवाई करण्यात येणार आहे.