अमेठी (उत्तरप्रदेश) येथील ग्रामपंचायतीत सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर धर्मांधांकडून मिरवणुकीत वाजवले पाकचे गीत !

पोलिसांकडून देशद्रोहाचा गुन्हा नोंद

असे लोकप्रतिनिधी भारताच्या हिताची कामे काय करणार ? भारतात राहून पाकशी एकनिष्ठ असणार्‍या अशा लोकप्रतिनिधींना पाकमध्ये पाठवा !

अमेठी (उत्तरप्रदेश) – येथील मंगरा ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत सरपंच म्हणून निवडून आल्यानंतर इमरान खान या विजयी उमेदवाराच्या समर्थकांनी ‘नया पाकिस्तान आया, इमरान खान आया’ हे गाणे मिरवणुकीत वाजवल्याने इम्रान याच्यासहित जाकिर अहमद, मशूद, मकसूद, इश्तियाक आणि अन्य ५० जण यांच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. या घटनेचा व्हिडिओ प्रसारित झाल्यावर ही कारवाई करण्यात आली. (व्हिडिओ प्रसारित झाला नसता, तर पोलिसांना ही घटना समजलीच नसती, यातून पोलिसांचा गुप्तचर विभाग काय करतो, हे लक्षात येते ! – संपादक)