सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेकडून व्हेंटिलेटरसाठी ३ कोटी रुपये !

व्हेंटिलेटर (प्रातिनिधिक छायाचित्र)

सातारा, ८ मे (वार्ता.) – व्हेंटिलेटर बेडविना रुग्णाचा मृत्यू होऊ नये यासाठी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने पुढाकार घेतला आहे. शासकीय रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि कोरोना केंद्र यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडून ३ कोटी रुपयांचे व्हेंटिलेटर आणि ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत, अशी माहिती बँकेचे अध्यक्ष आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.