भारततील कोरोनाचे संकट दूर होण्यासाठी इस्रायलमधील ज्यूंकडून प्रार्थना आणि ‘ॐ नमः शिवाय’चा जप !

स्थूल रूपाने अनेक जण नेहमीच साहाय्य करत असतात; मात्र इस्रायलमधील ज्यू धर्मियांनी अशा प्रकारे जप आणि प्रार्थना करून केलेले साहाय्य अनमोल आहे ! यातून तेच भारतियांचे, हिंदूंचे खरे मित्र आहेत, हे स्पष्ट होते !

नवी देहली – भारतातील कोरोनाच्या वाढत्या संकटाच्या काळात देश-विदेशांतून साहाय्य करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमीवर इस्रायलमधील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात भारतातील संकट दूर होण्यासाठी शेकडोंच्या संख्येने ज्यू नागरिक एकत्र येऊन ‘ॐ नमः शिवाय’ हा जप आणि प्रार्थना करत आहेत. हा व्हिडिओ इस्रायलमधील भारताचे राजनैतिक अधिकारी पवन पाल यांनी पोस्ट केला आहे.