राज ठाकरे यांनी त्यांचे हिंदुत्वाचे सूत्र प्रभावीपणे पुढे केल्यामुळे इतरांना पोटशूळ ! – परशुराम उपरकर, मनसे

एका हिंदुत्वनिष्ठ पक्षाने हिंदुत्वाची कास सोडल्यामुळे राज ठाकरेंनी हिंदुत्वाचा विषय जो बाळासाहेबांनी उचलून धरला होता, त्याचे समर्थन केल्याने इतरांना डोकेदुखी झाली आहे.

हिंदूंनो, काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येऊ नये, यासाठी वेळीच सावध व्हा ! – मनोज खाडये, हिंदु जनजागृती समिती

सिंधुदुर्गातही ‘लव्ह जिहाद’चे प्रकार घडत आहेत. आपण वेळीच सावध होऊन संघटित झाले पाहिजे, म्हणजे काश्मिरी पंडितांसारखी वेळ आपल्यावर येणार नाही.

अर्थसंकल्पीय अधिवेशनात सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांची उणीदुणी काढण्यात व्यस्त ! – परशुराम उपरकर, राज्य सरचिटणीस, मनसे

आर्थिक घोटाळे अनेक अधिकारी एकमेकांच्या संगनमताने करतात. हेही उघड होत आहे. त्यामुळे आघाडीतील तिन्ही पक्ष आणि भाजप हे अपकीर्त होत आहेत.

शासकीय कामात अडथळा आणल्याच्या प्रकरणी तारकर्लीच्या सरपंच सौ. स्नेहा केरकर यांच्यावर गुन्हा नोंद

जनता लोकप्रतिनिधींचा आदर्श घेत असते. त्यामुळे लोकप्रतिनिधींचे अशाप्रकारचे वर्तन जनतेला कोणता आदर्श देणार ? हा प्रश्‍नच आहे !

कोटकामते (जि. सिंधुदुर्ग) ग्रामपंचायतीतील भ्रष्टाचाराच्या प्रकरणी सरपंच आणि तत्कालीन ग्रामसेवक यांच्यावर गुन्हा नोंद

देवगड तालुक्यात शिक्षण विभागात झालेल्या लाखो रुपयांच्या घोटाळ्याच्या पाठोपाठ कोटकामते ग्रामपंचायतीमधील घोटाळा उघड होण्याची ही दुसरी घटना आहे.

कुडाळ (जि. सिंधुदुर्ग) टपाल कार्यालयाची १ कोटी १ लाख रुपयांची फसवणूक

आतापर्यंत विश्‍वासार्ह वाटणार्‍या टपाल खात्यातही भ्रष्टाचार होऊ लागल्याने सर्वसामान्य जनतेने गुंतवणूक कुठे करावी ? हा प्रश्‍न निर्माण होत आहे !

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सार्वजनिक जलस्रोतांच्या तपासणीत २९ ठिकाणच्या पाण्याचे नमुने अयोग्य

जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता मोहिमेच्या माध्यमातून जिल्ह्यातील पिण्याच्या पाण्याच्या एकूण ५ सहस्र ९४१ स्रोतांचे ३ सहस्र ७०५ महिलांच्या माध्यमातून पाण्याची तपासणी करण्याच्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.

जगातील ३० सर्वांत सुंदर पर्यटनस्थळांमध्ये महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्याचा समावेश

‘काँड नास्ट ट्रॅव्हलर’ या लंडन येथील प्रवासाविषयीच्या प्रसिद्ध पुस्तिकेत या वर्षीच्या सूचीमध्ये सिंधुदुर्गची निवड होणे म्हणजे सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटनाच्या दृष्टीने आंतरराष्ट्रीय दर्जाचा जिल्हा आहे, यावर शिक्कामोर्तब !

सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संदेश सावंत यांना न्यायालयीन कोठडी

शिवसैनिक संतोष परब यांच्यावरील आक्रमण – पोलिसांनी त्यांना येथील न्यायालयात उपस्थित केले असता न्यायालयाने सावंत यांना २ दिवसांची पोलीस कोठडी बजावली होती. त्याचा कालावधी संपल्याने पोलिसांनी सावंत यांना येथील न्यायालयात उपस्थित केले.

भाजपचे आमदार नितेश राणे यांची पोलिसांकडून चौकशी

परब यांच्यावरील आक्रमणाच्या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा, यासाठी राणे यांनी प्रथम जिल्हा न्यायालयात आणि नंतर मुंबई उच्च न्यायालयात अर्ज प्रविष्ट केला होता. या दोन्ही ठिकाणी राणे यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आला. उच्च न्यायालयाने त्यांना २७ जानेवारीपर्यंत अटक करू नये’, असा आदेश दिला.