अकबरुद्दीन ओवैसी यांच्यावर कारवाई करण्याची मराठा महासंघ आणि शिवप्रेमी यांची मागणी

मराठा महासंघ १९ मेनंतर ओवैसी यांच्या विरोधात न्यायालयात तक्रार नोंद करणार आहे, अशी माहिती मराठा महासंघाचे जिल्हा संयोजक तथा सकल मराठा समाजाचे अध्यक्ष अधिवक्ता सुहास सावंत यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तळमळीने सेवा केली, तर त्याची फलनिष्पत्ती वाढते ! – सद्गुरु सत्यवान कदम, धर्मप्रचारक, सनातन संस्था

आपली साधना खडतर आणि कठोर असली, तरच ईश्वर प्रकट होईल. साधना करणे जीवनाचा अविभाज्य घटक आहे. येत्या काळात साधनेविना तरणोपाय नाही. या काळात साधनेमुळेच मनोबल वाढेल. यासाठी आपण करत असलेली साधना गुणात्मक करूया.

मुख्याधिकार्‍यांच्या दालनात कचरा टाकण्याची वेंगुर्लाचे माजी नगराध्यक्ष गिरप यांची चेतावणी

गेले काही दिवस शहरातील कचरा उचलला जात नसल्याने शहरात कचरा साठला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता आहे. कचराच उचलला जात नसल्याने नागरिकांनीही स्वच्छता कर न भरण्याचा निर्णय घेतला आहे.

सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यांतील खाणींमध्ये पर्यावरणविषयक नियमांची पायमल्ली

पुढील  ८ दिवसांत संबंधितांवर कोणत्याही प्रकारची कारवाई न झाल्यास भाजपच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी चेतावणी राजन तेली यांनी निवेदनातून दिली आहे.

कुडाळ शहरातील अनधिकृत भोंगे त्वरित काढा ! – हिंदुत्वनिष्ठ संघटनांची मागणी

आमचा कोणत्याही धर्माच्या प्रार्थनेला विरोध नाही. सर्वांना आपापल्या धर्माचे पालन करण्याचे स्वतंत्र आहे; परंतु कोणत्याही धर्माच्या उपासना पद्धतीद्वारे इतर धर्मियांना त्रास होत असेल, तर ही विचार करण्यासारखी गोष्ट आहे.

कोटकामते ग्रामपंचायतीच्या तत्कालीन सरपंचांना ३६ लाख रुपयांच्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणी पोलीस कोठडी  

ग्रामपंचायत हा केवळ गावाच्या नव्हे, तर देशाच्या विकासाचा पाया असतो. त्यामुळे येथील लोकप्रतिनिधी आणि ग्रामसेवक प्रामाणिक असतील, तरच हा पाया भक्कम होऊ शकतो. याचे भान लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यांनी ठेवायला हवे.

हिंदुत्वाची मशाल प्रत्येक हिंदूच्या मनात प्रज्वलित करण्याचा प्रयत्न करू ! – धर्मप्रेमींचा निश्‍चय

ही कार्यशाळा म्हणजे हिंदुत्वाचे एक धगधगते अग्नीकुंड असून या अग्नीकुंडातून आमच्या मनात प्रज्वलित झालेल्या हिंदुत्वाच्या मशालीने आम्ही पुढील काळात आपापल्या भागातील हिंदूंच्या मनात हिंदुत्वाच्या मशाली प्रज्वलीत करू.

कोकण रेल्वेमार्गावरील गाड्या १ मेपासून विजेवर धावणार

कोकण रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण आता पूर्ण झाले असून १ मे २०२२ पासून रेल्वेगाड्या विजेच्या इंजिनवर धावणार आहेत. त्यामुळे कोकणवासियांचा प्रवास जलद आणि प्रदूषणविरहित होईल, असा विश्‍वास कोकण रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला.

देवगड ग्रामीण रुग्णालयातील रक्त साठवणुकीची यंत्रणा कार्यान्वित न केल्यामुळे नागरिकांची परवड !

देवगड येथील ग्रामीण रुग्णालयात जुलै २०२० मध्ये बसवण्यात आलेली रक्त साठवणुकीची यंत्रणा १८ मासांनंतरही कार्यान्वित करण्यात आलेली नाही.

सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजाच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांचा निषेध

आमदार अमोल मिटकरी यांनी ब्राह्मण समाज, तसेच हिंदु धर्मातील धार्मिक संस्कार यांविषयी बेताल वक्तव्य केली आहेत. त्यामुळे आम्ही आमदार मिटकरी यांचा तीव्र निषेध करत असून त्यांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हा नोंद करावा, अशी मागणी सिंधुदुर्ग जिल्हा ब्राह्मण समाजाच्या वतीने प्रशासनाकडे करण्यात आली आहे.