सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तलाव आणि धरणे पर्यटनदृष्ट्या विकसित करण्यात येणार !

प्रतिवर्षी पर्यटन विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च होत असतो. यातील काही निधी यापुढे जिल्ह्यात असलेली धरणे आणि तलाव यांच्या सुशोभिकरणावर खर्च व्हावा. त्यामुळे पर्यटन व्यवसायालाही चालना मिळेल.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात शासकीय वैद्यकीय महाविद्यालय होण्यास विलंब लागण्याची शक्यता

राष्ट्रीय आयुर्विज्ञान आयोगाकडून करण्यात आलेल्या पहाणीत आढळलेल्या त्रुटींची पूर्तता करण्यास प्रशासनाला अपयश आले आहे. त्यामुळे आता पुन्हा पहाणी करण्यात येईल अन् त्या वेळी त्रुटी निघाल्यास त्यांची पूर्तता प्रशासनाकडून करण्यात येईल.

आध्यात्मिक पत्रकारितेचा वसा घेतलेल्या मिलिंद चवंडके यांना राज्यस्तरीय ‘दर्पण’ पुरस्कार प्रदान !

महाराष्ट्राच्या विविध भागांमधून आलेल्या पत्रकारांनी मिलिंद चवंडके यांना भेटून अध्यात्मिक पत्रकारिता आणि इतिहास संशोधन हे वेगळेच क्षेत्र पत्रकारितेसाठी निवडल्याविषयी कौतुक केले.

किर्लोस कृषी विज्ञान केंद्रात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार !

स्थानिक शेतकर्‍यांसह परिसरातील शेतकर्‍यांना या केंद्राचा लाभ व्हावा, यासाठी शेतकर्‍यांनी काही एकर भूमी विनामूल्य दिली आहे; मात्र शेतकर्‍यांना हवातसा लाभ  झालेला नाही.

कुणकेरी-आंबेगाव रस्त्याचे काम १५ जानेवारीपर्यंत चालू करण्याच्या आश्‍वासनानंतर ग्रामस्थांचे आंदोलन मागे

रस्त्याचे काम चालू करायचे होते, तर ग्रामस्थांवर आंदोलन करण्याची वेळ का आणली ? याचे उत्तर प्रशासनाने दिले पाहिजे. ‘जनरेटा आल्याशिवाय काम कराचे नाही’, अशी मानसिकता प्रशासनाची झाली आहे, असे समजायचे का ?

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील इयत्ता ९ वी ते १२ वीपर्यंतच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारीपर्यंत बंद

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील सर्व माध्यमांच्या सर्व शाळा १५ फेब्रुवारी २०२२ पर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत.

अल्प वेळेत आणि अल्प खर्चात न्याय मिळण्यासाठी न्यायालयांचे विकेंद्रिकरण आवश्यक ! – न्यायमूर्ती भूषण गवई, सर्वाेच्च न्यायालय

औरंगाबाद खंडपिठासाठी सुद्धा विरोध झाला होता. आता त्याचा लाभ अनेक जिल्ह्यातील पक्षकारांना होत आहे. त्यामुळे कोल्हापूर येथे खंडपीठ व्हावे, ही मागणी योग्यच आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण

जिल्ह्यात कोरोनाचे ९१ नवीन रुग्ण आढळले, तर मृत्यू झाल्याची नोंद नाही. मृत्यू झालेल्या रुग्णांची एकूण संख्या १ सहस्र ४६५ झाली आहे.

साथीच्या रोगांकडे प्रशासन कोरोनाच्या दृष्टीकोनातून बघत असल्याने जनता भयभीत ! – प्रसाद गावडे, कुडाळ तालुकाध्यक्ष, मनसे

जनतेला भयभीत करून सोडण्यापेक्षा ग्रामीण रुग्णालये, आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे यांच्या माध्यमातून तात्काळ साथीच्या आजारांवर उपयोगी औषधोपचार चालू करावेत.

विद्यापिठांच्या स्वायतत्तेवर नियंत्रण आणण्याचा महाराष्ट्र शासनाचा डाव ! – अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, सिंधुदुर्ग

प्रभारी कुलपती पदावर राजकीय व्यक्ती नियुक्त करून शिक्षण क्षेत्रात राजकीय हस्तक्षेप साधण्याचा डाव राज्य सरकार करत आहे, असा आरोप करत अशा प्रकारचे विधेयक तात्काळ रहित करण्यात यावे अन्यथा विद्यार्थ्यांच्या रोषाला सामोरे जावे लागेल !