हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी प्रयत्न केले, तर प्रभु श्रीरामाची कृपा आपल्यावर होईल ! – शंभू गवारे, पूर्व आणि पूर्वोत्तर राज्य संघटक, हिंदु जनजागृती समिती

श्री. गवारे यांनी रामनवमी साजरी करण्यामागील शास्त्र, पूजा विधी, प्रभु श्रीराम यांच्या जीवनाशी संबंधित घटनांशी असलेला साधनेचा संबंध आणि त्याचे महत्त्व, मनुष्य जीवनाचा उद्देश, श्री कुलदेवता आणि श्री गुरुदेव दत्त यांचा नामजप करण्याचे महत्त्व आदी विषयांवर मार्गदर्शन केले.

मुंबई येथे श्रीरामनवमीनिमित्त आयोजित ‘ऑनलाईन सत्संगा’त जिज्ञासूंनी अनुभवले श्रीरामतत्त्व !

मुंबई जिल्ह्यातील एकूण १५ ठिकाणी घेतलेल्या या सत्संगांत ५२० जिज्ञासूंनी सहभाग घेऊन श्रीरामतत्त्वाचा अनुभव घेतला. या सत्संगाचे वैशिष्ट्य म्हणजे अनेक जिज्ञासूंना चांगल्या अनुभूती येण्यासह उपस्थित प्रत्येकालाच श्रीरामाचे तत्त्व अनुभवता आले.

कांदिवली (मुंबई) येथे श्रीरामनवमी ते हनुमान जयंती सप्ताहानिमित्त महिलांसाठी ‘ऑनलाईन’ शौर्यजागृती व्याख्यान

या वेळी व्याख्यान ऐकतांना महिलांनी ‘आपणही स्वरक्षणासाठी सिद्ध व्हायला हवे’, असे वाटत असल्याचे सांगितले आणि याविषयी ७ दिवसांचा एक नियमित वर्ग घेण्याची विनंती केली.

केरळमध्ये ऑनलाईन ‘श्रीराम जपयज्ञ’ भावपूर्ण वातावरणात पूर्ण

प्रारंभी सनातनच्या साधिका सौ. स्मिता सिजू यांनी भावाचर्ना केली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालना कु. मेघना सिजू हिने केले. भावार्चनेनंतर सर्वांनी नामजप केला. या कार्यक्रमाचा लाभ अनेक जिज्ञासूंनी घेतला.

भक्तशिरोमणी संकटमोचन हनुमानाची विविध गुणवैशिष्ट्ये !

हनुमंत भगवंताचा परम भक्त होता; त्यामुळे त्याच्यामध्ये लेशमात्रही अहंकार नव्हता. हनुमंतासारख्या अहंशून्य भक्ताच्या माध्यमातून, भगवंताने श्रीरामावतारात रावण, इंद्रजीत, अहिरावण, महिरावण इत्यादी मोठ्या असुरांचे गर्वहरण केले होते.

राम नाही, तर मोत्याची माळही कवडीमोलच !

सीतेला समजते की, आपण माळ दिली, असे जे आपल्याला वाटले, ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी ही माळ दिली. ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळ्यात घालतो.  

भीषण आपत्काळात तरून जाण्यासाठी हनुमंताची उपासना करा ! – प.पू. दास महाराज

‘कोरोना संसर्गाची स्थिती लक्षात घेऊन प्रतिवर्षीप्रमाणे उत्सवाला मंदिरात न येता घरूनच श्रीरामरायांचे ध्यान करावे’, असे आवाहन प.पू. दास महाराजांनी रामभक्तांना केले

श्रीरामनवमीनिमित्त हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांच्या वतीने पार पडला ‘ऑनलाईन’ सोहळा !

कोरोनाच्या संसर्गामुळे मंदिरात न जाताही सोेहळ्याच्या निमित्ताने घरीच श्रीरामाचे अस्तित्व अनुभवल्याची अनेकांनी घेतली अनुभूती !

ऑनलाईन कार्यक्रम असूनही श्रीरामाची आरती आणि पाळणा ऐकतांना अनेकांची झाली भावजागृती !

केवळ सनातन संस्थेने असा ऑनलाईन कार्यक्रम घेतल्यामुळे श्रीरामाच्या मंदिरात न जाताही अनुभूती घेता आली याविषयी अनेकांनी कृतज्ञता व्यक्त केली.

रामभक्तशिरोमणी भरताची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये !

या लेखामध्ये आपण रामभक्त भरताची आध्यात्मिक गुणवैशिष्ट्ये पाहूया आणि ‘भरतासारखी निस्सीम रामभक्ती आमच्या हृदयात निर्माण होऊ दे’, अशी भगवंताच्या चरणी प्रार्थना करूया.