
एकदा श्रीराम आणि सीतामाता यांना भेटण्यासाठी हनुमान येतो अन् त्या दोघांना मनोभावे नमस्कार करतो. तेव्हा सीतेला वाटते, हनुमान आपल्या स्वामींचा भक्त आहे. तो नेहमी त्यांची सेवा करतो. त्याला आपण काहीतरी द्यावे. असे वाटून ती आपल्या गळ्यातील माळ काढून हनुमानाला देते आणि म्हणते, ‘‘मी तुझ्यावर प्रसन्न झाले आहे. माझ्याकडून तुला ही मोत्याची माळ देत आहे.’’
ती माळ घेऊन हनुमान समोर जाऊन बसतो. माळेतील एकेक मणी काढतो आणि प्रत्येक मण्याचा प्रथम वास घेतो. नंतर प्रत्येक मणी फोडतो, बघतो आणि टाकतो. असे करत माळेतील सर्व मणी तो फोडून टाकतो. हे बराच वेळ चालू असलेले वागणे पाहून सीतामाता त्याला विचारते, ‘‘तुला प्रेमाने दिलेल्या माळेचे हे काय केलेस ? प्रत्येक मणी फोडलास. तू असे का केलेस ?’’ तेव्हा हनुमंत म्हणतो, ‘‘मला काही केल्या माळेत आणि माळेतील कोणत्याही मण्यात राम कुठेच दिसला नाही. मला माझा राम कुठे दिसतो का ? ते मी बघत होतो. ज्याच्यात राम नाही, ते सर्व मी टाकून दिले.’’
हनुमानाचे बोलणे ऐकल्यावर सीतेला समजते की, आपण माळ दिली, असे जे आपल्याला वाटले, ते श्रीरामाचे स्मरण न करताच मी ही माळ दिली. श्रीरामच सर्व काही करत असतो. ती हनुमानाची क्षमा मागते. श्रीरामाचे स्मरण करून ती हनुमानाला दुसरी माळ देते. ती माळ हनुमान लगेच गळ्यात घालतो.
(संदर्भ : ‘बालसंस्कार’ संकेतस्थळ)
साधकांनो, शब्दशक्तीच्या माध्यमातून विकल्प पसरवण्यासाठी कार्यरत असलेल्या सातव्या पाताळातील मोठ्या वाईट शक्तींचा डाव ओळखून साधना वाढवा !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांनी निर्मिलेला साधनामार्ग गुरुकृपायोग !
अर्पणदात्यांनो, गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने धर्मकार्यार्थ धन अर्पण करून गुरुतत्त्वाचा लाभ करून घ्या !
सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी त्यांचे ग्रंथलिखाण आणि सनातनच्या काही साधकांना मिळणारे सूक्ष्म ज्ञान यांच्या संदर्भात विचारलेल्या प्रश्नांचे सूक्ष्म ज्ञानातून उलगडलेले आध्यात्मिक विश्लेषण !
जीवनात सर्वांत मोठी प्राप्ती ईश्वरकृपा हीच होय !
सनातन संस्थेच्या साधकांचे एक वेगळे वैशिष्ट्य : गुरुकृपेने सूक्ष्मातील जाणू शकणे !