काँग्रेसला निवडून देणार्‍या हिंदूंना हीच शिक्षा योग्य ! 

‘जयपूर येथील भाजपचे आमदार आणि शहराचे माजी महापौर अशोक लाहोटी यांनी शहराच्या पोलीस आयुक्तांना पत्र लिहून शहरातील हिंदु मंदिरांवरील भोंगे बलपूर्वक बंद का केले ? याविषयी त्यांना जाब विचारला आहे.

कानपूर (उत्तरप्रदेश) मंदिरांची भूमी बळकावून त्यावर बिर्याणीची दुकाने थाटल्याचे  उघड !

हिंदूंना धर्मशिक्षण नसल्याने त्यांना त्यांच्या श्रद्धास्थानांचे मूल्य नाही ! त्यामुळेच ते असे प्रकार चालू देतात ! ‘अशांना संकटकाळी भगवंताने तरी का वाचवावे ?’ असा प्रश्‍न कुणाच्या मनात आल्यास त्यात चूक ते काय ? असे प्रकार कधी अन्य पंथियांच्या श्रद्धास्थानांच्या संदर्भात घडतात का ?

मंदिरांकडे वक्रदृष्टीने पहाण्याचे धैर्य होणार नाही, असे संघटन निर्माण करा ! – अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर, राष्ट्रीय अध्यक्ष, हिंदु विधीज्ञ परिषद

सरकार मुसलमानांच्या भूमींसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च करत आहे आणि हिंदूंच्या मंदिरांच्या भूमी मात्र लुटल्या जात आहेत.

हिंदूंच्या श्रद्धास्थानांचे हनन म्हणजे नियोजित षड्यंत्रच ! – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

आंध्रप्रदेशात सरकार मंदिरांचे कोट्यवधी रुपये घेते, तर ते मंदिरांना सुरक्षा का पुरवत नाहीत ? दोनशेहून अधिक मंदिरांत एकाच पद्धतीने आघातांच्या घटना घटतात, तेव्हा ते हिंदूंच्या श्रद्धांचे हनन करण्याचे सुनियोजित षड्यंत्र आहे, हे सरकारला का कळत नाही ?

ब्रिटीश काळातील कायदे कालबाह्य ठरवून मंदिरे हिंदूंच्या कह्यात द्या ! – गिरिधर ममिडी, राज्य उपाध्यक्ष, प्रज्ञा भारती, तेलंगाणा

स्वातंत्र्यानंतर आतापर्यंत आलेल्या कोणत्याही सरकारने यात पालट घडवून आणण्यासाठी प्रयत्न केले नाहीत. त्यामुळेच आज जर आपल्या मंदिरांना वाचवायचे असेल, तर ‘एंडोव्हमेंट’ कायदा रहित करणे, हाच एकमेव पर्याय आहे.

केवळ मंदिरात जाणारे नव्हे, तर त्यांचे रक्षण करणारे हिंदु व्हा ! – ह.भ.प. रामकृष्ण हनुमंत महाराज वीर, पंढरपूर

जर मंदिरात होणारी एखादी परंपरा पटत नसेल, तर त्याची तक्रार सरकारकडे न करता आपले धर्मगुरु, शंकराचार्य अथवा हिंदु जनजागृती समिती यांच्याकडे करा.

हिंदूंचे मर्यादित यश !

आज विविध राज्यांतील सरकारांनी मंदिरांच्या संपत्तीवर डोळा ठेवून मंदिरांचे सरकारीकरण करण्याचा सपाटा लावला असतांना रावत यांनी मुख्यमंत्री झाल्याच्या अवघ्या एका मासात मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करण्याची केलेली धडाकेबाज घोषणा सुखद आहे.

राष्ट्र आणि धर्म यांच्या सद्य: स्थितीसंदर्भात समाजाचे योग्य दिशादर्शन करणारे विशेष सदर : ११.४.२०२१

आमच्या वाचकांना राष्ट्र नि धर्म यांच्या अनुषंगाने आपली विचारधारा कशी असली पाहिजे, याचे दिशादर्शन करण्याचा आमचा प्रयत्न आहे. यातून राष्ट्र आणि धर्म यांचा अभिमान बाळगणारे कृतीशील वाचक घडावेत, एवढीच अपेक्षा !

चारधामसह ५१ मोठी मंदिरे सरकारीकरणातून लवकरच मुक्त करणार !

तीरथसिंह रावत यांचा आदर्श घेऊन देशातील अन्य राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीही त्यांच्या राज्यांतील सहस्रो मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून भक्तांच्या कह्यात द्यावीत !

धार्मिक गोष्टींत होणारा राजकीय हस्तक्षेप हा दांभिकपणा ! – अश्‍वती तिरूनाल गौरी लक्ष्मीबाई, केरळ

आमच्या राजघराण्याकडून थिरूवनंतपूरम् येथील पद्मनाभस्वामी मंदिराची देखभाल केली जाते. मी स्वतःला या देवाची सेवक मानते; पण जे सरकार देवाला मानत नाही, ते सरकार देवस्थानची काळजी कसे काय घेऊ शकते ?