हिंदु राष्ट्र येण्यापासून आता कुणीही रोखू शकणार नाही ! – जगद्गुरु परमहंसाचार्य, तपस्वी छावणी, अयोध्या, उत्तरप्रदेश

अयोध्येतून ‘सनातन प्रभात’चे विशेष वार्तांकन 

अयोध्यानगरीत २२ जानेवारी या दिवशी सुवर्ण अक्षरांनी इतिहास लिहिला जाणार : श्री रामललाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा !

श्रीरामाच्या स्वागतासाठी अयोध्यानगरी सज्ज !
ऐतिहासिक श्रीराममंदिराचेही होणार उद्घाटन !

विशेष संपादकीय : रामराज्याची नांदी . . . !

धर्माचे अधिष्ठान ठेवून शत्रूला धडकी भरवणारे केलेले हिंदूसंघटन आणि धर्माचरणाने वागणारी प्रजा आदर्श हिंदु राष्ट्राची निर्मिती करू शकते. रामभक्तांनी आता उपासनेची गती वाढवून राष्ट्रोत्थानाच्या कार्यात सिंहाचा वाटा उचलण्यासाठी संघटितपणे झोकून दिले, तर रामराज्याची पहाट खरोखरच दूर नसेल !

कारसेवकांचे अविस्मरणीय अनुभव !

प्रत्यक्ष श्रीरामाच्या अस्तित्वाची जाणीव ! बांधकाम आडवे न पडता उभेच कोसळत होते. खरेच, हे पुष्कळ आश्चर्यजनक होते. सरळ उभे न कोसळता जर ते बाजूला कोसळले असते, तर कितीतरी मानवीहानी झाली असती. कित्येक व्यक्ती मृत्यूमुखी पडल्या असत्या. हा चमत्कार नव्हे, तर काय म्हणायचे ?

श्रीरामललाच्या दर्शनसाठी अयोध्येत भारताच्या कानाकोपर्‍यातून भाविक पोचले !

अयोध्या येथे श्रीरामललाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वी प्रभु श्रीरामाचे दर्शन घेण्यासाठी भारताच्या कानकोपर्‍यातून भाविक अयोध्या येथे आले आहेत.

Sanatan Prabhat Exclusive : श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दागिन्यांचे मूल्यांकन केल्याची नोंद ताळेबंदामध्ये यायला हवी ! – लेखापरीक्षक संजय सूर्यवंशी

देवाचे दागिने आणि मंदिरातील चांदी यांची ताळेबंदामध्ये नोंद नसल्याचे लेखापरीक्षकांनी स्पष्ट नमूद केले आहे. यावरून मंदिरे समितीची अनागोंदीच उघड होत आहे.

#Exclusive : तत्कालीन पुजार्‍यांनी दागिन्यांची रीतसर सूची देऊनही मंदिर समितीने ३८ वर्षांपासून दागिन्यांची माहिती लपवली !

मंदिर सरकारीकरणाचा दुष्परिणाम जाणा ! यास उत्तरदायी असणार्‍यांवर कठोर कारवाई होणे आवश्यक आहे. मंदिरांचे पावित्र्य जपण्यासाठी ती भक्तांच्याच कह्यात असली पाहिजेत !

Exclusive : पंढरपूर येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराच्या कारभारात अनागोंदी !

मंदिर सरकारीकरणाचे गंभीर दुष्परिणाम जाणा ! देवनिधीचा असा अपहार करणे आणि तो होऊ देणे महापाप आहे, हे जाणून हिंदूंनी याविरुद्ध संघटितपणे वैध मार्गाने आवाज उठवावा आणि सर्व मंदिरे सरकारीकरणातून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करावेत !

दैनिक सनातन प्रभातचा रंगीत दत्तजयंती विशेषांक

प्रसिद्धी दिनांक : २६.१२.२०२३

विशेषांकाची वाढीव मागणी वितरकांनी २५ डिसेंबरला दुपारी ३ पर्यंत ‘ईआर्पी प्रणाली’त भरावी !

द्वितीय महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद !

श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान, लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान, श्री क्षेत्र भीमाशंकर देवस्थान, हिंदु जनजागृती समिती, तसेच महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने ओझर (पुणे) येथे २ आणि ३ डिसेंबर या दिवशी पार पडलेली, ६५० विश्वस्त आणि प्रतिनिधी यांच्यामध्ये कुटुंबभावना अन् धर्मबंधुत्व निर्माण करणारी…