वर्धापनदिनासाठी वाचकांचे विचार

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे आमचे जीवन आनंदी झाले ! – कु. शशांक नवनाथ मोरे, भडगाव-खोंडे, तालुका खेड

दैनिक ‘सनातन प्रभात’मुळे साधना करून तन, मन आणि धनाचा त्याग करून ईश्वरप्राप्ती कशी करावी ? ते समजले. त्यामुळे आमचे जीवन आनंदी झाले. दैनिकामधून येणारे श्रीगुरूंचे विचार आचरणात आणण्याचा प्रयत्न करतो. असे मार्गदर्शक दैनिक दिल्याविषयी सच्चिदानंद परब्रह्म गुरूंच्या चरणी कोटी कोटी प्रणाम आणि कृतज्ञता !


काळाच्या ओघात लुप्त झालेली बरीच माहिती ‘सनातन प्रभात’च्या माध्यमातून मिळत आहे त्याबद्दल मनःपूर्वक धन्यवाद ! लोकजागरण आणि हिंदूचे (सनातनींचे ) प्रबोधन हा उद्देश नक्कीच साध्य होत आहे. वर्धापनदिनाच्या अनेक शुभेच्छा ! – श्री. रवींद्र आणि राजेंद्र पेठे. पुणे


मी दैनिक ‘सनातन प्रभात’ची नियमित वाचिका आहे. गेली २० वर्षे माझ्याकडे ‘सनातन प्रभात’ येत आहे. दैनिक वाचल्यामुळे एक वेगळं चैतन्य मिळते. माझ्याकडे अन्य दैनिके येत असत; परंतु ‘सनातन प्रभात’मध्ये सत्यघटनेवर बातम्या असतात आणि याचा पायाही आध्यात्मिक आहे. संत आणि साधक यांचे विचार उद्बोधक आहेत. त्यामुळे मी केवळ ‘सनातन प्रभात’ वाचते. हे दैनिक वाचल्या शिवाय चैन पडत नाही. कृतज्ञता !
– सौ. विजयश्री अशोक लांजेकर, बसणी, रत्नागिरी.


मी साप्ताहिक ‘सनातन प्रभात’चा नियमित वाचक आहे. या नियतकालिकांद्वारे हिंदूंवर होणार्‍या अत्याचारांना वाचा फोडली जाते. त्याचप्रमाणे हिंदूंना पूज्य असणार्‍या व्यक्ती आणि देवीदेवतांच्या विषयी उपयुक्त माहिती दिली जाते. ‘सनातन प्रभात’ एक दर्जेदार साप्ताहिक आहे. कृतज्ञता ! – श्री. मिलिंद हळबे, लांजा