नेपाळमध्ये ५ परदेशी नागरिक असलेले हेलिकॉप्टर बेपत्ता

नेपाळमधील माऊंट एव्हरेस्ट पर्वताजवळ एक हेलिकॉप्टर बेपत्ता झाले. हेलिकॉप्टरने सकाळी सवादहा वाजता उड्डाण केल्यानंतर पुढील १० मिनिटानंतर त्याचा नियंत्रण कक्षाशी संपर्क तुटला. या हेलिकॉप्टरमध्ये वैमानिक आणि ५ विदेशी नागरिक होते.

देहलीत चुकीच्या दिशेने जाणार्‍या शाळेच्या बसच्या धडकेत ६ जणांचा मृत्यू

नवी देहली येथील मेरठ महामार्गावर एक मार्गी रस्त्यावर विरुद्ध दिशेने आलेल्या शाळेच्या बसने एका चारचाकी गाडीला धडक दिल्याने या गाडीतील ६ जणांचा मृत्यू झाला, तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. मृतांमध्ये २ लहान मुले, २ महिला आणि २ पुरुष यांचा समावेश आहे.

मुंबईत चुनाभट्टी येथे भीषण अपघात, एकाचा मृत्‍यू !

चुनाभट्टी येथे मुंबई ईस्‍टर्न एक्‍सप्रेस हायवेवरून भरधाव वेगाने जाणार्‍या ट्रकने ४ वाहनांना धडक दिली. यामध्‍ये एकाचा जागीच मृत्‍यू झाला असून ३ जण गंभीर घायाळ आहेत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसामुळे जनजीवन विस्कळीत

जिल्ह्यात चौथ्या दिवशीही पावसाची संततधार चालू आहे.
* देवगड येथील शाळेतील वर्गात पाणी, तर मालवण तालुक्यातील शाळेचे छप्पर कोसळले
* सावंतवाडी-बेळगाव वाहतूक पाऊण घंटा ठप्प

मडगाव (गोवा) येथील पोर्तुगीजकालीन इमारतीतील आरोग्य केंद्राचा दर्शनी भाग कोसळला

सुदैवाने ही घटना केंद्र चालू नसतांना घडल्याने कोणतीही अप्रिय घटना घडली नाही. इमारतीचा काही भाग इमारतीखाली उभ्या केलेल्या एका दुचाकीवर पडल्याने दुचाकीची हानी झाली.

ठाणे येथे महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या बसला अपघात, २ जण घायाळ !

बस आणि कंटेनर यांची धडक झाल्याने वाहक बसलेल्या बसच्या दर्शनी भागाची मोठ्या प्रमाणात हानी झाली आहे. या वेळी बसमध्ये ९ प्रवासी होते. त्यामधील बस वाहक अमर परब आणि प्रवासी महिला गीता कदम हे दोघे घायाळ झाले आहेत.

गोव्यात ५० इंच पावसाचा टप्पा पार : जनजीवन विस्कळीत

राज्यात दरड कोसळणे, झाडे पडणे, घर आणि इतर संसाधने यांची हानी होणे असे प्रकार चालूच आहे. राज्यातील अनेक ठिकाणे पाण्याखाली गेली आहेत. हवामान खात्याने पुढील ६ दिवस काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असल्याची (ऑरेंज अलर्ट) चेतावणी दिली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात नदीकाठच्या गावांना सतर्कतेची चेतावणी

या पावसामुळे वीजवितरण यंत्रणा काही ठिकाणी कोलमडली आहे, तसेच झाडांच्या पडझडीमुळे वाहतुकीवरही परिणाम झाला आहे. काही ठिकाणी घरे, गोठे यांसह वित्तहानीच्या घटना घडल्या आहेत.

बसचालक शेख दानिश मद्यधुंद अवस्‍थेत असल्‍याने अपघात घडल्‍याची शक्‍यता !

प्रादेशिक परिवहन विभागाने टायर फुटल्‍यामुळे अपघात झाला का ?’, याचे अन्‍वेषण केले. त्‍यासाठी टायरच्‍या खुणा आणि नमुनेही पडताळण्‍यात आले; पण रस्‍त्‍यावर टायर फुटल्‍याच्‍या कोणत्‍याही खुणा आढळल्‍या नाहीत.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस

जिल्ह्यात गेले २ दिवस मुसळधार पाऊस पडत असून नदी, नाले यांच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे. मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी वाहतुकीवर परिणाम झाला आहे. तसेच काही ठिकाणी वीजपुरवठ्यावर परिणाम झाला आहे.