ठाणे, ३० जुलै (वार्ता.) – भिवंडी येथील नारपोली भागातून ३० जुलैला सकाळी सुटलेली ठाणे महानगरपालिका परिवहन सेवेची बसगाडी ठाणे चेंदनी कोळीवाड्याच्या दिशेने जात होती. रात्री ८.३० वाजता बस सेंट्रल मैदान येथे आली असता इंजिनमध्ये अचानक आग लागली.
मुंबई: महाराष्ट्र की राजधानी मुंबई से सटे ठाणे से बड़ी खबर सामने आ रही है जहां ठाणे नगर परिवहन (टीएमटी) बस के इंजन में एकाएक आग लग गई. जिसके बाद बस में अफरा-तफरी मच गई जहां आनन-फानन में सभी यात्रियों को बस से उतारा गया. #Inkhabar #Maharashtra #FireBreakOut pic.twitter.com/MZrWFXluwt
— InKhabar (@Inkhabar) July 30, 2023
चालक आणि वाहक यांनी याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाला दिली. आपत्ती व्यवस्थापन, अग्नीशमन दलाचे जवान घटनास्थळी आले. स्थानिक रहिवासी आणि महानगरपालिकेचे कर्मचारी यांच्या साहाय्याने ५० प्रवाशांना बसगाडीच्या मागील दरवाज्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आले.