पुणे येथे ‘बी.आर्.टी.’ मार्गांवर बसगाड्यांची धडक !

२९ प्रवासी किरकोळ घायाळ

अपघातग्रस्त बस

पुणे – नगर रस्‍त्‍यावरील ‘बी.आर्.टी.’ मार्गामध्‍ये १ ऑगस्‍ट या दिवशी २ बसगाड्यांची समोरासमोर धडक झाली. त्‍यामध्‍ये चालकासह २९ प्रवासी किरकोळ घायाळ झाले आहेत. त्‍यांच्‍यावर ससून सर्वोपचार रुग्‍णालयामध्‍ये उपचार करण्‍यात आले. त्‍यामध्‍ये कुणालाही गंभीर दुखापत झाली नाही. नगर रस्‍त्‍यावर तळेगाव ढमढेरे ते मनपा ही बस पुण्‍याकडे येत होती. तर दुसरी बस वाघोलीच्‍या दिशेने जात होती. या वेळी वाघोलीकडे जाणारी बस समोरून येणार्‍या बसला धडकली. घायाळांमध्‍ये ८ महिला, १७ प्रवासी, दोन्‍ही गाड्यांचे चालक आणि वाहक यांचा समावेश आहे.